
Jalgaon News : नायलॉन मांजाविरोधात वन्यजीव संरक्षण संस्था Action Mode वर
जळगाव : राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉन मांजावर बंदी आणल्यानंतरही स्थानिक प्रशासनाकडून काहीअंशी दखल घेतली जात आहे. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण संस्थेनेही नायलॉन मांजाविरोधात जनजागृती प्रबोधन मोहीम सुरू केली आहे.
मांजा, पतंग विक्रेत्यांना भेटून त्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम काय आहेत, याची माहिती देण्यात येत आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेने काय काळजी घ्यायला हवी, याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेची सुरवात शुक्रवारी (ता. ६) हरिविठ्ठलनगरपासून करण्यात आली.
पशु, पक्षी, मानवालाही जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याने सुज्ञ नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. मुख्यमंत्री, केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या. एका जनहित याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व जिल्ह्यांतील प्रशासनास नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई करण्याचे, विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.(Wildlife conservation organization awareness campaign against nylon manja Jalgaon News)
हेही वाचा: Nashik News: मुख्यमंत्रीसाहेब सातबाऱ्यावर नोंदी पैशांशिवाय होतच नाही! जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस
वन्यजीव संरक्षण संस्थेनेही मुख्यमंत्री कार्यालयासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महापालिका प्रशासनास लेखी तक्रार देऊन न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
नायलॉन मांजा विक्रेत्यांना, तसेच हा मांजा वापरून पतंग उडविणाऱ्या पतंगबाजांवर फौजदारी कारवाई करावी आणि विक्रेत्यांना एक लाखापर्यंत दंड करण्याची मागणी केली होती. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या शिष्टमंडळाने महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. याची दखल घेत महापौर जयश्री महाजन, सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या आदेशाने दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनाने नायलॉन मांजाविरोधात धडक मोहीम उघडली आहे.
जनजागृती मोहिमेस संस्थाध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, सचिव योगेश गालफाडे, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, राजेश सोनवणे, नीलेश ढाके, रवींद्र भोई, कृष्णा दुर्गे, प्रसाद सोनवणे, चेतन भावसार, पंकज सूर्यवंशी, अरुण सपकाळे, फ्रेंडस ऑफ ॲनिमलचे योगेश वानखेडे सहकार्य करीत आहेत.
हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
हेही वाचा: Nashik News : टपाल पार्सल सेवेच्या सिस्टीममधून चीन Out! कोरोना प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा बंद
पतंगोत्सवाच्या काळात अशी घ्या काळजी
*दुचाकीवर जाताना गळ्यात शक्यतो मफलर किंवा रुमाल बांधा
*आपल्या मुलांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका
*पतंग उडविताना हातमोजे वापरा
*नायलॉन मांजाचा वापर, विक्रीची पोलिसांना माहिती द्या
*जखमी पक्षी आढळल्यास वन विभाग हेल्पलाइन १९२६ वर संपर्क साधा
किंवा जवळच्या पक्षीमित्रांना बोलवा
हेही वाचा: Akola School News : थंडीच्या लाटेमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी