Jalgaon News : शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला दगावली

Jalgaon: The family and relatives of the deceased married during the protest in the district hospital premises
Jalgaon: The family and relatives of the deceased married during the protest in the district hospital premisesesakal

जळगाव : प्रसूतीनंतर उपचारात शिकाऊ डॉक्टरांकडून झालेल्या हजगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित शिकाऊ डॉक्टरसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मृत विवाहितेचे कुटुंब, नातेवाइकांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुुरुवारी (ता. २२) गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले.

आरती विकास गवळी (वय २२, रा. समतानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत्यूचे ठोस कारण शेाधण्यासाठी विवाहितेचा मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे.

समतानगरातील आरती गवळी यांना शनिवारी (ता. १०) दुपारी चारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. सोनोग्राफी न करता सायंकाळी सातला त्यांची शिकाऊ डॉक्टरांनी सिजरद्वारे प्रसूती केली.

(Woman died due to carelessness of apprentice doctor Allegations of relatives district stood against mismanagement of hospital Jalgaon News)

Jalgaon: The family and relatives of the deceased married during the protest in the district hospital premises
Jalgaon News : जळगावातील सुवर्णबाजारात सोने 56 हजारांवर

रात्रीच आरती यांचा रक्तदाब कमी होऊन प्रकृती चिंताजनक झाली, अशी माहिती डॉक्टरांतर्फे नातेवाइकांना देण्यात आली व महिलेस तुम्ही चांगल्या खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्लाही देण्यात आला.

वास्तविक महिलेस डिस्चार्ज देऊन कुटुंबियांच्या सुपूर्द करण्यास संबंधित डॉक्टरांनी चार ते पाच तास वाया घालवले. परिणामी, तिची प्रकृती आणखी बिघडली. रात्री एकच्या सुमारास महिलेला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर तब्बल ११ दिवस या महिलेचा जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते.

राणज्योत मालवली

गुरुवारी (ता. २२) सकाळी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आरती गवळी यांचा मृत्यू झाला. घडल्या प्रकाराने व्यथित आणि संतप्त नातेवाइकांनी विवाहितेचा मृतदेह थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी करत दीड-दोनशे महिला व पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Jalgaon: The family and relatives of the deceased married during the protest in the district hospital premises
Jalgaon News : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटी मंजूर

आंदोलकांच्या मागण्या

शिकाऊ डॉक्टरांकडून प्रसूतीनंतर प्राथमिक उपचारही व्यवस्थित करण्यात आले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असून, संबंधित शिकाऊ डॉक्टर व घटनेला जबाबदार वरिष्ठ डॉक्टरांवर कारवाई व्हावी, मत विवाहितेच्या मृतदेहाची इन कॅमेरा (वैद्यकीय समिती समोर) शवविच्छेदन व्हावे, संबंधितांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागण्यांवर आंदोलक ठाम होते.

मृतदेह धुळ्याला रवाना

आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस उपधीक्षक संदीप गावित यांनी रुग्णालयात येऊन नातेवाइकांशी संवाद साधला. त्यानंतर नातेवाइकांनी अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेतली. अधिष्ठाता यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन चौकशी करतो आणि धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. नंतर मृतदेह धुळ्याकडे रवाना करण्यात आला.

Jalgaon: The family and relatives of the deceased married during the protest in the district hospital premises
Jalgaon News | ठाकरे सेनेचे आंदोलन बेगडी, दिशाभूल करणारे: डॉ. राधेश्‍याम चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com