पिंप्राळ्याच्या वैभवचा पूर्णा नदी पात्रात बुडाल्याने मृत्यू

पिंप्राळा येथील दहावीच्या विद्यार्थ्याचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
Death
Deathesakal

कुऱ्हा काकोडा : येथून जवळच असलेल्या पिंप्राळा येथील दहावीच्या विद्यार्थ्याचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. वैभव विजय झाल्टे (वय १६) असे मृत मुलाचे नाव असून, ही घटना मंगळवारी (ता. १४) सायंकाळी घडली. यामुळे संपूर्ण गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

पिंप्राळा (ता. मुक्ताईनगर) येथील शेतकरी विजय झाल्टे यांचा मुलगा वैभव याने यावर्षी दहावीचे पेपर दिले असून, निकाल येणे बाकी आहे. दरम्यान, शेतकरी विजय झाल्टे आपल्या शेतात नांगरटी करीत होते. दुपारी तीन ते साडेतीनपर्यंत वैभव घरीच होता. मात्र, वैभव आणि त्याचा मित्र नांगरटी सुरू आहे, म्हणून शेतात गेले. थोड्यावेळ थांबल्यानंतर वडिलांना सांगितले घरी जातो. मात्र, घरी न जाता शेतीपासून अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर असलेल्या पूर्णा नदीकाठावर गेले आणि पोहण्यासाठी कपडे काढून पूर्णा नदीपात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने वैभव पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मित्राने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते फळाला आले नाही. त्याने धावपळ करून शेतात असलेल्या वैभवच्या वडिलांना सांगितले. वैभवचे वडील विजय झाल्टे क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन पाण्यात उडी घेऊन वैभवला बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.

Death
विष प्राशन करुन विवाहितेची आत्महत्या; 3 महिन्यांची चिमुरडी पोरकी

शाळेत सर्वांचा लाडका

वैभव कुऱ्हा येथील शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी होता. त्याचा स्वभाव मनमिळाऊ होता आणि तो हुशार होता. या वर्षी त्याने दहावीचे पेपर दिले आहेत. मात्र निकाल बाकी आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षक गावात आले असता वैभवला घेऊन ते गावात शाळा प्रवेशासाठी फिरले. त्याचा हसरा चेहरा, मनमिळाऊ स्वभावाने तो सर्वांचाच लाडका होता. मात्र, पिंप्राळ्याचे ‘वैभव’ ‘पूर्णा’ने गिळले.

Death
बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

गावात चूल पेटली नाही

वैभवच्या मृत्यूचे समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मंगळवारी सायंकाळी एकाही घरी चूल पेटली नाही. वैभव हा पिंप्राळ्याचे माजी पोलिसपाटील (कै) रघुनाथ पाटील यांचा नातू, तर माजी सरपंच विष्णू झाल्टे यांचा पुतण्या होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com