Jalgaon Crime News : जुन्या वादातुन तरुणाला बदडले; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Jalgaon Crime News : जुन्या वादातुन तरुणाला बदडले; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथनगरात मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाला महिलेसह तीन ते चार जणांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (young man beaten up from old dispute jalgaon crime news)

एकनाथनगरात सूरज राजरूप राजपूत (वय २६) त्याच्या घरासमोर मंगलाबाई नावाची महिला वास्तव्यास आहे.

सोमवारी (ता. २३) रात्री दहाच्या सुमारास सूरज त्याच्या घरासमोर उभा असताना, मागील भांडणाच्या कारणावरून मंगलाबाई व इतर जणांनी सूरज यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Bravery Award : करणच्या दारिद्र्याला शौर्याची झालर; राष्ट्रीय बालवीरता पुरस्काराचा मानकरी

एकाने सूरजच्या डाव्या हातावर चाकू मारून दुखापत केली. यामुळे सूरज जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी सूरजच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात मंगळवारी (ता. २४) एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्रसिंग पाटील तपास करीत आहे.

हेही वाचा: Jalgaon news : गोद्री कुंभस्थळी संत- महंतांचे आगमन; हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी