Jalgaon Crime News : क्षुल्लक कारणावरून तरूणाला मारहाण | young man was beaten up jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Jalgaon Crime News : क्षुल्लक कारणावरून तरूणाला मारहाण

Jalgaon News : खेडी बुद्रुक (ता. जळगाव) येथे कबुतराच्या कारणावरून एका तरुणाला पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. (young man was beaten up jalgaon crime news)

प्रवीण ज्ञानेश्‍वर पाटील (वय २१, रा. भगवाननगर, खेडी बुद्रुक) हा वेल्डिंगचे काम करून उदरनिर्वाह करतो. सोमवारी (ता. २९) रात्री दहाला तो घरी असताना चिक्या (पुर्ण नाव माहित नाही, रा. जैनाबाद) याच्याशी त्याचा वाद झाला.

यात दोघांमध्ये हमरा-तुमरी होवुन मारहाणीस सुरवात झाली. झटापटीदरम्यान चिक्याने कंबरेतून काढलेल्या धारदार शस्त्राने प्रवीणच्या पाठीवर वार करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी देत तो पसार झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जखमी प्रवीण याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.