Jalgaon News : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Death News
Death Newsesakal

Jalgaon News : शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील योगेश्वरनगरात २२ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. समीर शेख राजमोहमंद (वय २२, रा. इंदिरानगर शाहूनगर) असे मृताचे नाव आहे.

बुधवारी (ता. २१) दुपारी एकला जिन्याखाली कोबा करीत असताना, जिन्याखाली बसविलेल्या कूपनलिकेची वायर समीरच्या मानेला चिकटली.

विजेच्या धक्क्याने शेख समीर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिक व बांधकाम कामगारांनी वीजपुरवठा बंद केला व समीरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.(Youth dies due to electric shock jalgaon News)

समीरच्या तोंडातून फेस आला व तो बेशुद्ध पडला, असा बनाव करण्यात आला. मात्र, वायर चिकटल्याने मृताच्या मानेवर काळा चट्टा पडला होता. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेख समीर याच्या मागे लहान भाऊ आणि विधवा आई आहे. कुटुंबाच्या उदनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या मृत्यूला जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंब व नातेवाईकांनी केली आहे.

वीज कंपनीच्या तज्ज्ञ बोलावून पंचनामा

शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी योगशे माळी व सहकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन वीज कंपनीच्या तज्ज्ञांना बोलावून वायरिंगची पाहणी करून पंचनामा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Jalgaon News : कर्मचारी भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करा; राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com