esakal | सरकारच्या 5 विभागात नोकरीची संधी, पगारही चांगला
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारच्या 5 विभागात नोकरीची संधी, पगारही चांगला

सरकारच्या 5 विभागात नोकरीची संधी, पगारही चांगला

sakal_logo
By
शरयू काकडे

नवी दिल्ली : स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी विविध शासकीय विभागात भरती सुरू आहे.या सरकारी नोकरीमध्ये बँकेपासून शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि अप्रेंटिस अशा पदांच्या भरती होणार आहे. भरती नोटीफिकेशननुसार स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये विशेष संवर्ग अधिकारी(Special Cadre Officer) अंतर्गत फायर इंजीनियरच्या 16 जागा रिक्त आहेत. पंजाब मध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer) च्या 320 जांगाची भरती होणार आहे. अशाच प्रकारे आर्मी पब्लिक स्कूल, जयपुरमार्फत टीजीटी और पीजीटी शिक्षकांच्या जागांवर भरती होणार असल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये टीजीटी और पीजीटी शिक्षकांच्या 58 जागा भरती होईल. त्याशिवाय हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये, डिग्री/डिप्लोमा अप्रेंटिससाठी भरती होणार आहे. पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत आपल्या उत्तर भागातील डिप्लोमा ट्रेनीच्या पदांसाठी भरती करणार आहे. निवडलेल्या उमेदवाराने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कनिष्ठ अभियंता पद दिले जाईल.

एसबीआय स्पेशल कॅडर ऑफिसरची भरती

स्पेशल कॅडर ऑफिसरच्या(SBI Special Cadre Officer) पद भरतीसाठी SBI ने मार्फत फायर इंजीनियरच्या पदांसाठी अर्ज मागवले आहे. पात्रता आणि इच्‍छुक उमेदवार, SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज पाठवू शकतात. उमेदवार 28 जून 2021 मध्ये अर्ज पाठवू शकता. नोटिफिकेशननुसार फायर इंजीनियर च्या एकूण 16 जागांसाठी भरती होणार आहे

हेही वाचा: पर्मनंट लायसन्स केव्हा? चार लॉकडाउनचा दहा हजार नागरिकांना फटका

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नोकरी

महारत्न कंपनी पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत त्यांच्या उत्तर विभागासाठी 'ट्रांसमिशन सिस्टम II' साठी डिप्लोमा ट्रेनीच्या जागांची भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी powergrid.in वेबसाईटवर जाऊन 12 जुलैपर्यंत अर्ज पाठवावा. त्यासाठी अर्ज पाठविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडलेल्या उमेदवाराने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कनिष्ठ अभियंता पद दिले जाईल.

हेही वाचा: परदेशात शिकताना... : स्थापत्य अभियांत्रिकीतून नवनिर्माणाच्या संधी

पंजाब में कम्युनिटी हेल्थ ऑफिसरमध्ये पद भरती

पंजाबमध्ये फरीकोट येथील बाबा फरीद यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेजमार्फत राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन पंजाब (NHM Punjab) साठी सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer) च्या 320 पदांसाठी भरती होणार आहे. एनएचएम पंजाब सीएचओ भरती 2021साठी उमेदवारांनी 25 जून च्या आधी bfuhs.ac.in किंवा nhm.punjab.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

हेही वाचा: संधी नोकरीच्या... : फॅशन डिझायनिंग : क्रिएटिव्ह, ग्लॅमरस

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये टीजीटी आणि पीजीटी शिक्षकांच्या जांगासाठी भरती

जयपुर येथील आर्मी पब्लिक स्कूलमार्फत टीजीटी आणि पीजीटी शिक्षकांच्या जांगासह इतर पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या पदांसाठी उमेदवारांनी एपीएस च्या अधिकृत वेबसाइट apsjaipur.edu.in वर जाऊन अर्ज पाठवावा. नोटिफिकेशननुसार 58 रिक्त जागांसाठी भरत होणार आहे.

हेही वाचा: माणुसकी अजूनही जिवंत!; अखेर वेदिकाला दिली १६ कोटींची लस

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये अप्रेंटिस पदभरती

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिग्री आणि डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेड मध्ये भरती होणार आहे. या जागा हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेच्या कानपुर येथील ट्रांसपोर्ट एयरक्रॉफ्ट डिव्हीजनसाठी भरती होणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी विंग्स, लायब्ररी सायन्स, फार्मसी यासह विविध व्यवसायात अ‍ॅप्रेंटिससाठी रिक्त पदे आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 जून 2021 पासून सुरू होईल आणि 30 जून 2021 पर्यंत चालू राहील. यासाठी अर्ज ऑफलाइन आहेत.

loading image
go to top