esakal | व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन अन् वृक्षारोपणातून रक्षा विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन अन् वृक्षारोपणातून रक्षा विसर्जन

(कै.) पाटील यांच्या अमेरिकेत नोकरीस असलेल्या थोरल्या मुलाने त्यांच्या पार्थिवाचे अमेरिकेतून व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेतले. त्यांना लॉकडाउनमुळे वडिलांच्या अंत्यविधीस येणे शक्‍य नसल्याने पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना त्यांना व त्यांच्या पत्नीस दुःख अनावर झाले होते.

व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन अन् वृक्षारोपणातून रक्षा विसर्जन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रेठरे बुद्रुक : शेरे येथील विश्वनाथ भास्कर पाटील यांचे नुकतेच निधन झाले. बुधवारी (ता. 15) त्यांच्या रक्षाविसर्जनावेळी जमा केलेली रक्षा कृष्णा नदीमध्ये विसर्जित न करता त्यांच्या कुटुंबीयांनी त्या आपल्या शेतात दोन खड्ड्यांत टाकून तेथे वृक्षारोपण केले. रक्षाविसर्जन केल्यानंतर नदीत होणारे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी पाटील कुटुंबीयांनी हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला. 

पाटील कुटुंब हे गावामध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रात नावाजलेले आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विधायक कार्याची परंपरा कायम राखण्यासाठी कुटुंबीयांनी (कै.) पाटील यांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता शेतात दोन खड्डे घेऊन त्यामध्ये अर्पण केल्या. त्यावर दोन फळरोपांची लागवड केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रक्षाविसर्जनवेळी स्मशानभूमीत गर्दी न करता सामाजिक अंतर राखण्याबरोबर यावेळी उपस्थित मोजक्‍याच नातेवाईकांसाठी आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हात धुण्याची वेगळी सोय ठेवून संबंधित विधी पार पाडला. पाटील कुटुंबाच्या रक्षाविसर्जन न करता वृक्षारोपण करण्याच्या त्यांच्या या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन... 

(कै.) पाटील यांच्या अमेरिकेत नोकरीस असलेल्या थोरल्या मुलाने त्यांच्या पार्थिवाचे अमेरिकेतून व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेतले. त्यांना लॉकडाउनमुळे वडिलांच्या अंत्यविधीस येणे शक्‍य नसल्याने पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना त्यांना व त्यांच्या पत्नीस दुःख अनावर झाले होते. 

कोरोनाच्या लढाईत विविध घटक फ्रंट फुटवर आहेत. ई - सकाळच्या वाचकांसाठी आम्ही खास काही प्रेरणादायी बातम्या घेऊन आलाे आहाेत. त्या सविस्तर वाचा

Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?

CoronaFighters : ते नेहमीच आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावतात

Video : हारायचं न्हाय गड्या, रडायचं न्हाय...कोरोनाला हरवून टाकायचं हाय

Video : चला मधुमेहच लॉकडाउन करु


कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकाचा पुढाकार; सकाळ रिलीफ फंडा ला दिली मदत

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या