आम्ही जातो आमच्या गावा ; एसटीला गणपतीबाप्पा पावला !

27000 kokan people return to mumbai with the help of maharashtra state transportation services from kokan
27000 kokan people return to mumbai with the help of maharashtra state transportation services from kokan

रत्नागिरी : दरवर्षी गणेशोत्सवाला आलेले मुंबईकर चाकरमानी अनंत चतुर्दशी व पुढील दोन दिवसांत पुन्हा मुंबईत परततात. मात्र, यंदा अनंत चतुर्दशीला आठवडा होऊन गेला तरी दररोज चाळीस ते पन्नास फेऱ्या मुंबईला रवाना होत आहेत. लॉकडाउनमुळे अडकून पडलेले चाकरमानी आता पुन्हा म्हाळवस करून मुंबईला परतत आहेत.

आतापर्यंत १,२२५ फेऱ्यांमधून २७ हजार १९९ प्रवासी मुंबईला परतले आहेत. अजूनही काही दिवस मुंबईच्या वाढीव फेऱ्या चालू राहणार आहेत. कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंग आणि पुरेशी काळजी घेऊन एसटी वाहतूक सुरू आहे. एका वेळी गाडीमधून फक्त २२ प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी आहे. त्यामुळे यंदा एसटीने फक्त साडेचार हजार चाकरमानी गणेशोत्सवासाठी दाखल झाले. परत जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या त्यापेक्षा सहा ते सात पटीने जास्त म्हणजे २७ हजार इतकी आहे. याचे कारण म्हणजे २३ मार्चपासून जो लॉकडाऊन सुरू झाला, त्यानंतर परवानगी घेऊन खासगी वाहनाने मुंबईकर चाकरमानी आपापल्या गावी दाखल झाले. 

जाण्यासाठी आता त्यांना एसटीचाच आधार आहे. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गौरी गणपती, वामन द्वादशी आणि अनंत चतुर्दशीनंतर प्रवाशांनी मुंबई गाठली. रविवारी (६) दिवसभरात देवरुखमधून सर्वाधिक १२ फेऱ्या, राजापूर ११ आणि  गुहागर येथून १० फेऱ्या मुंबईला सोडल्या. यात २८ फेऱ्या ग्रुप बुकिंगच्या व आरक्षणाद्वारे २७ अशा एकूण ५५ फेऱ्यांमधून १३१७ प्रवासी रवाना झाले. विशेष म्हणजे चिपळूणमधून एकही फेरी मुंबईला रवाना झाली नाही. एकूण ४९४ फेऱ्या ग्रुप बुकिंग व ७३१ फेऱ्या ऑनलाइन, थेट आरक्षणाद्वारे केले. या फेऱ्यांमध्ये पुढील आठवडाभर वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे आणखी चाकरमानी मुंबईला परतणार आहेत.

६ सप्टेंबरपर्यंत एकूण फेऱ्या व प्रवासीसंख्या 


आगार          एसटीच्या फेऱ्या          प्रवासी संख्या
मंडणगड             ८६                        २०५४
दापोली              १०७                        २३३२
खेड                  ११६                        २५७३
चिपळूण             ११५                        २६८३
गुहागर               १६६                        ३७५६
देवरूख              १७०                        ३८१५
रत्नागिरी              ११३                       २३९२
लांजा                   २७                       २६६१
राजापूर               २२५                       ४९३३
एकूण                १२२५                    २७,१९९

 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com