आदित्य ठाकरे उद्या राणेंच्या बालेकिल्ल्यात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे कोकण प्रांत पिंजून काढणार आहेत. खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ते आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील.

मुंबई : शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा शनिवार (ता.14) पासून सुरू होत असून यात्रेच्या निमित्ताने ते संपूर्ण कोकण पिंजून काढणार आहेत.

जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे कोकण प्रांत पिंजून काढणार आहेत. खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ते आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील.

- भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर अपेक्षेपेक्षा कमी: आयएमएफ

14 तारखेला सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, राजापूर आणि रत्नागिरीला संवाद साधतील. यानंतर 15 तारखेला गुहागर, चिपळूण, खेड, महाड आणि पेण तालुका ते पिंजून काढणार आहेत. 16 तारखेला अलिबाग, पेण, कर्जत, उरण, पनवेल, बेलापूर, ऐरोलीला ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तर 17 तारखेला वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर आणि ठाणे शहराला भेट देऊन जनआशीर्वाद यात्रेला संबोधित करतील.

- खुद्द मुख्यमंत्री फडणवीस उदयनराजेंना घेऊन जाणार दिल्लीला

कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातो. दीपक केसरकर, उदय सामंत, भास्कर जाधव, गणेश नाईक यांच्यासारखे दिग्गज नेते शिवसेनेत आल्याने कोकणात शिवसेनेला 'अच्छे दिन' आले आहेत. तर नारायण राणे यांची कोंडी झाली आहे. यातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. शिवसेनेला कोकणाकडून खूप अपेक्षा आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाल्याने सर्वांचं लक्ष या यात्रेकडे लागलं आहे.

- करण जोहर म्हणतोय, 'विकी कौशलला वाचवा'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray will be arriving in Konkan tomorrow for Jan Aashirwad Yatra