रत्नागिरीत 8 मार्च नंतर पुणे मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचा सक्तीचा आदेश..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

रत्नागिरी जिल्हयामध्ये मुंबई व पुणे शहरातून  08 मार्च  2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून घरातून  बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्हयामध्ये मुंबई व पुणे शहरातून  08 मार्च  2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून घरातून  बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशीत केले आहे.

शासनाने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक  13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतूदीनुसार  अधिसूचना निर्गमीत केलेली आहे.

हेही वाचा- धास्ती कोरोनाची : एव्हरेस्टसह इतर मोहिमाही रद्द

एकत्रीत येण्यापासून प्रतिबध ​

सध्यास्थितीत संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात बहुतांश भागात, रत्नागिरी जिल्हयासह कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव  विषाणूबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्गाने होतो. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या  रुग्णांपासून  व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य इसमांपासून  दुसऱ्या इसमांना सदर विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्हयामधील लोकांना एकत्रीत येण्यापासून प्रतिबध करणे आवश्यक आहे.

हेही वाचा- न्यालयीन कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

आदेश जारी
मुंबई व पुणे यासारख्या मोठया शहरात कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड-१९) संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या पासून  अन्य इसमांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई व पुणे शहरातून  रत्नागिरी जिल्हयात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रत्नागिरी जिल्हयातील नागरीक आल्यास त्यामुळे स्थानिक नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयामध्ये मुंबई व पुणे शहरातून 08 मार्च 2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण रत्नागिरी यांनी आदेश जारी केला आहे.

हेही वाचा- अन्‌ गर्भवती महिला सुखरूप घरी परतली...!

आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 व कलम 56 व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 खाली दंडनीय कारवाई करण्यात तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश , परिपत्रक या ओदशासह अंमलात राहतीत असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 8 March Pune residents were forced to stay at home kokan marathi news