सरकारातील मंत्र्यांची फक्त नौटंकी; राज ठाकरे बोलले की बुडबुडे येतात ; बाळ मानेंचा घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bal mane

'सरकारातील मंत्र्यांची फक्त नौटंकी; राज ठाकरे बोलले की बुडबुडे येतात'

रत्नागिरी : मंत्र्यांना बोलायला वेळ नाही पण हे मतांसाठी झोळी पसरत आले होते. रत्नागिरीतले रस्ते बघा, गुळगुळीत झाले आहेत. आपणच केलेल्या चुका आहेत. ६४ कोटी देऊनही पाणीयोजना पूर्ण झाली नाही फक्त नौटंकी सुरू आहे. म्हणूनच बंगल्यांची नावे बदलली जात आहेत, असा टोला माजी आमदार बाळ माने (Bal Mane) यांनी लगावला.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackeray) बोलले मग यांना बुडबुडे आले. डोंगर पोखरून उंदीर काढला. यात काय मर्दुमकी, रस्ते करा. लोकांना चालता येत नाही. त्यांनी मिंधे करून ठेवले आहेत. त्यामुळेच ही स्थिती झाली आहे. प्रामाणिकपणा असेल तर कोणाला घाबरण्याची गरज आहे.

हेही वाचा: सुदर्शन पटनायक यांनी कमाल खान यांना वाहिली खास श्रद्धांजली

माने यांनी अधिकाऱ्यांनाही खरमरीत बोल सुनावले. वरिष्ठांची खुषमस्करी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विनाकारण वेठीस धरले तर गाठ माझ्याशी आहे. बडतर्फी करू नका, हे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करून, त्रास देऊन कर्मचाऱ्यांचे काही कमी-जास्त झाले तर तुमची जबाबदारी असेल. कर्मचाऱ्याला त्रास झाला तर बघा. पूर्वी एक अधिकारी होते. बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देत होते. त्यांचे पुढे काय झाले याची कर्मचाऱ्यांना आठवण आहे, असे ते म्हणाले.

प्रवाश्यांना चांगली सेवा दिली पाहिजे, स्पर्धा आहे. पर्यटक, प्रवासी हे आपले देव आहेत. एसटीची चांगली प्रतिमा राखली पाहिजे. एसटी बस तुम्हीच स्वच्छ करा डबल बेल मारू नका, गाडी थांबवा, असे बोल कर्मचाऱ्यांना सुनावले. राहून चालक, वाहक, मेकॅनिक हे अत्यावश्यक आहेत. अधिकारी पदे बरीच आवश्यकता नाहीये, असेही ते म्हणाले.

शिमग्यात सरकारचा कार्यक्रम

शिमग्यात या सरकारचा कार्यक्रम आटपायचा आहे, असे दिसते. गुढीपाडवा नवीन हिंदू नववर्ष तुमचे असणार आहे. मी भाषण करून टाळ्या वाजवण्यासाठी आलो नाही पण संपामध्ये सरकारने लक्ष देणे गरजेचे होते. २००४ सालापासून एसटी कशी लुटली जात आहे. परंतु मागील सरकारच्या काळात भाजपवाल्यांनी लुटलेली नाही, असे माने म्हणाले. आता कोणी येऊन कंत्राटे घेतली असली तर माहिती नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top