

Integrated Tourism: Connecting Historical Shrines and Coastal Sights of Raigad and Ratnagiri
Sakal
पाली : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जलमार्गाने जोडणाऱ्या वेश्वी-बागमांडला फेरीबोट सेवेला सध्या प्रवाशांची आणि पर्यटकांची प्रचंड पसंती मिळताना दिसत आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेक पर्यटक रायगडमधील विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन या फेरीबोटने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करत आहेत, तर काही पर्यटक रत्नागिरीवरून रायगड मार्गे मुंबई-पुण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. अतिशय कमी वेळात आणि खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.