भुईबावडा घाटमार्गे वाहतूक 8 दिवसांत सुरु होणार

डोंगराकडील बाजूने रुंदीकरण करुन घाटमार्ग सुरु करणे शक्य
भुईबावडा घाटमार्गे वाहतूक 8 दिवसांत सुरु होणार

वैभववाडी : भुईबावडा घाटात ज्याठिकाणी भेग पडली आहे, त्याठिकाणी रस्ता गटाराच्या बाजुने रूंद करून येत्या आठ दिवसात या घाटमार्गे वाहतुक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. शेवाळे यांनी येथे झालेल्या बैठकीत दिले. या कामाची सुरूवात तत्काळ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार राणे यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, रितेश सुतार, स्वप्नील खानविलकर आदी उपस्थित होते. भुईबावडा घाटमार्गाचा भुईबावडा, उंबर्डे, खारेपाटण, पाचल यासह विविध गावांना वाहतुकीकरीता उपयोग होतो. असा हा घाट सहा महिने वाहतुकीसाठी बंद ठेवणे ही तालुकावासीयांची चेष्टा आहे.

भुईबावडा घाटमार्गे वाहतूक 8 दिवसांत सुरु होणार
वाऱ्या‍मुळे मासेमारीचा मुहूर्त हुकणार; मच्छीमारांमध्ये संभ्रम

पालकमंत्र्यांनी घाटरस्त्याची पाहणी न करता घेतलेला घाटमार्ग बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय पूर्ण चुकीचा आहे, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. त्यावेळी कार्यकारी अभियंता शेवाळे यांनी दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण पुढे केले. यावेळी आमदार राणे यांनी अधिक्षक अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करताना 'घाटात काम चालू करा; मार्ग लवकर पुर्ववत करा, अशा सुचना केल्या. त्यावेळी डोंगराकडील बाजूने रुंदीकरण करुन घाटमार्ग सुरु करणे शक्य असल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे काम उद्यापासूनच सुरु केले जाईल. युद्धपातळीवर काम करुन पुढील आठ दिवसात या मार्गावरुन वाहतूक सुरु करण्यात येईल, असे आश्वासन शेवाळे यांनी दिले.

दरम्यान तालुक्यातील सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. काही रस्ते अतिवृष्टीत वाहून गेले आहेत. रस्त्याने चालणेही मुश्कील झाले आहे. या सर्व रस्त्यांची पाहणी करुन तात्काळ त्याची डागडुजी करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. नेर्ले - सावडावजवळ पुल पुरात वाहून गेला असल्याचे स्वप्नील खानविलकर यांनी सांगितले. पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

भुईबावडा घाटमार्गे वाहतूक 8 दिवसांत सुरु होणार
आता कोणालाच दिसणार नाही Google सर्च हिस्ट्री; जाणून घ्या टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com