esakal | रत्नागिरी - मंडणगडकरांची चिंता वाढली ; कोरोना रूग्णांच्या संखेत होतेय झपाट्याने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient increase in ratnagiri mandangad taluka

मार्च महिन्यापासून तालुक्यात लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टंसींग यामुळे कोरोना विषाणूचा तालूक्यात शिरकाव रोकण्यात यश आले होते.

रत्नागिरी - मंडणगडकरांची चिंता वाढली ; कोरोना रूग्णांच्या संखेत होतेय झपाट्याने वाढ

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड - रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची टक्केवारी वाढत असताना मंडणगड तालुक्यातही अँटीजेन टेस्ट पॉजिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूरू झालेल्या अँटीजेन टेस्टमध्ये तालुक्यात एकूण 414 अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या यापैकी 18 जण पाॅझीटीव आले आहेत. शहरातील परिवार पार्क वसाहतीत आतापर्यंत एकूण 16 रुग्ण सापडल्याने हा परिसर अखेर कंटेंटनमेंट झोन म्हणून सील करण्यात आला असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच तालुक्यात एकूण 61 कोरोना बाधितांची संख्या झाली असून त्यातील 18 ऍक्टिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागाला अधिक सतर्क रहावे लागणार आहे.


मार्च महिन्यापासून तालुक्यात लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टंसींग यामुळे कोरोना विषाणूचा तालूक्यात शिरकाव रोकण्यात यश आले होते. मात्र मे महिन्यामध्ये  सर्वात अधिक रूग्ण मंडणगड तालूक्यात आढळूण येत होते. यामुळे संपूर्ण तालुक्यातत घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टेस्ट बंद करण्यात आल्या व गरज भासल्यास तपासणी करण्याचे आदेश दिल्याने कोरोना गायब झाला होता. पंधरा मे नंतर तालुक्यात अपवादात्मक एखादा संशयीत सापडला होता. यानंतर मात्र जुलै महिना अखेर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण सापडला नाही. किंबहूना तशी लक्षणेही कोणास आढळून आली नाहीत. मुंबई -पूणे येथून आलेले चाकरमानी याच बरोबर जून महिन्यात निसर्ग वादळानंतर तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी यांनाही कोणत्याही प्रकारे कोरोना प्रादूर्भाव दिसून आला नाही. मात्र गणेशोत्सवाच्या कालावधीत अँटीजेेेन चाचणी करण्यास सूरूवात झाली. यामध्ये बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले, तर अँटीबॉडी टेस्टमध्ये दोन शासकीय कर्मचारी पाॅझीटीव आल्याचे समजत आहे. शासकीय कर्मचारी अधिक संख्येने वास्तव्यास असणारे परिवार पार्क परिसरात पाॅझिटीव येण्याचे प्रमाण अधिक आहे.

हे पण वाचा -  Good News : गोव्यातून महाराष्ट्रात वाहनांना आता येणे झाले सुलभ 

नगरपंचायतीची कार्यवाही; परिसराचे निर्जंतुकीकरण

मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या आदेशानुसार परिवार पार्क वसाहतीत कोरोना बाधित सापडलेल्या घरांचे व परिसराचे नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझर करून निर्जंतुकीकरण केले. वसाहतीतील नागरिकांना आवाहन करून सुरक्षित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत परिवार पार्कचा परिसर १३ सप्टेंबर 2020 पर्यंत कंटेंटमेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी नगरपंचायतीच्या वतीने 8855094951 हा कोरोना हेल्प लाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 


हे पण वाचाअखेर जाल्यात माेसोली घावली चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image