संगमेश्वर : पाच चिमुकल्यांमुळे अडलेल्या गायीची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow
संगमेश्वर : पाच चिमुकल्यांमुळे अडलेल्या गायीची सुटका

संगमेश्वर : पाच चिमुकल्यांमुळे अडलेल्या गायीची सुटका

संगमेश्वर : वासराला जन्म देताना अडकलेल्या गोमातेला तिच्या वासरासह सुखरूप ठेवणाऱ्या पाच चिमुकल्यांचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे. ही घटना काल (ता. ४) घडली. गाय आणि तिचे वासरू दोघेही सुखरूप आहेत.(cow and her calf are safe)

हेही वाचा: पुणे : चंदन तस्करी प्रकरणात एकास पकडले

याबाबत या घटनेचे प्रत्यक्षदर्शी अमोल शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्वरमधील आठवडा बाजाराजवळून शास्त्री नदी वाहते. याच नदीपलीकडे कोंडअसुर्डे गाव आहे. याच परिसरात एक गाय वासराला जन्म देत होती. त्या वेळी परिसरातील काही चिमुकली तिथे खेळत होती. वासराला जन्म देताना गाय अडकली आणि तिला होणारा त्रास पाहून यापैकीच फहीम सय्यद, फहीज सय्यद, तौफीक शेख, हर्ष सावंत, अथर्व चव्हाण ही १० ते ११ वर्षे वयाची चिमुकली तिथे धावली. त्यांनी आपल्या परीने प्रयत्न करून या गायीची आणि तिच्या वासराची सुखरूप सुटका केली.(kokan news)

हेही वाचा: पुणे : कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

गाय आणि वासरू सुखरूप असल्याचे पाहून या चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमोल शेट्ये यांनी या मुलांजवळ चौकशी केली असता त्यांच्याकडेही पाळीव जनावरे असल्याने त्यांनी हे प्रसंग यापूर्वीही अनुभवले आहेत आणि अशा मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी आम्ही कायम तयार असल्याचे सांगितले. यानंतर शेट्ये यांनी या गायीच्या आहाराची व्यवस्था केली.

हेही वाचा: महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

जनावरांचे संगोपन मालकांनी करावे

सध्या उनाड जनावरांचा प्रश्न ऐरणीवर असताना अशा जनावरांच्या बाबतीत घडणाऱ्या दुर्दैवी घटनाही अनुभवायला येतात. अशा स्थितीत या जनावरांचे संगोपन संबंधित मालकांनी केल्यास असे प्रसंग उद्‌भवणार नाहीत, असे शेट्ये यांनी सांगितले. दरम्यान, एवढ्या छोट्या वयात असतानाही प्रसंगावधान दाखवत या चिमुकल्यांनी केलेले चांगले काम सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KokanCow
loading image
go to top