पळस्तेत 53 लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्काची धडक कारवाई

वाहतुकीशी ‘सिंधुदुर्ग कनेक्‍शन’; जिल्ह्यातील संशयित मास्टरमाईंड
पळस्तेत 53 लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्काची धडक कारवाई

बांदा : सगळीकडे कडक लॉकडाउन (lockdown) असतानाही गोव्यातून महाराष्ट्रात (goa-maharashtra) राजरोस बेकायदा दारू वाहतूक सुरू (illegal alcohol) असल्याचे उघड झाले. मुंबईजवळच्या पळस्ते येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State excise duty) पथकाने आज ट्रकमधून सुरू असलेल्या दारू वाहतुकीचा पर्दाफाश करत तब्बल ५३ लाखांचा दारूसाठा जप्त केला. या वाहतुकीमागे सिंधुदुर्गातील (sidhiudurg) एकाचा हात असल्याचा जबाब संशयितांनी दिला आहे. हा ट्रक सिंधुदुर्गासह रत्नागिरी, रायगड जिल्हे पार करून गेलाच कसा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या कारवाईत रॉयल चॅलेंज, ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्की व ओल्ड मंक रमचे १८० मिली व ७५० मिली क्षमतेचे एकूण ५०० बॉक्‍स व वाहनासह एकूण ५६ लाख ५० हजार ५०० रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालक शिंकू विरेंद्रकुमार मिश्रा व शैलेश अच्युतन पद्मावती ट्रक क्‍लिनर यासह फरारी आरोपींवर विक्री करीता असलेला मद्याचा साठा बेकायदेशीररित्या वाहतूक करून महाराष्ट्र शासनाच्या महसूलाचे मोठया प्रमाणात नुकसान केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पळस्तेत 53 लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्काची धडक कारवाई
ATM फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; 53 लाखांचा डल्ला हुकला

या गुन्ह्याच्या पुढील तपासात गोवा निर्मित व विक्रीकरीता असलेला मद्यसाठा दुबे नामक मध्यस्थीमार्फत भरुन दिल्याचे संशयीतांनी सांगितले. हा मद्यसाठा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोईप परिसरातील एका व्यक्‍तीचा असल्याचे ते संशयीतांनी सांगितले. त्याच्याच सांगण्यावरुन संशयीत मद्यसाठयाने भरलेला ट्रक पनवेल येथे घेवून जात होता, अशी माहिती मिळाली.

आणखी काही संशयित?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये मद्यसाठा पुरवठादार, मद्य खरेदीदार यासह आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्‍यता मुंबई भरारी पथकाचे प्रमुख निरीक्षक संताजी लाड यांनी व्यक्त केली. या कारवाईमध्ये निरीक्षक मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक दिलीप काळेल यांचा समावेश होता.

पळस्तेत 53 लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्काची धडक कारवाई
सावधान! बेशिस्तपणे कचरा फेकाल तर फेसबुकवर दिसाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com