सतर्कतेचा इशारा: रत्नागिरी, सिंधुदुर्गात ‘ऑरेंज’अलर्ट

सतर्कतेचा इशारा: रत्नागिरी, सिंधुदुर्गात ‘ऑरेंज’अलर्ट

रत्नागिरी : रत्नागिरी,(Ratnagiri)सिंधुदुर्गात (Sindhudurg) हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट (Orange Alert) जारी केला असून वादळाची तीव्रता शनिवारी (ता. 15) वाढणार आहे; चक्रीवादळ (Cyclone) कोकण किनार्‍याला (kokan Beach) शुक्रवारी (ता. 14) धडकण्याची चिन्हे सायंकाळपासून दिसू लागली आहेत. समुद्रात हलक्या लाटा उसळत आहेत. पाण्यालाही करंट आहे. रत्नागिरीत सायंकाळी वार्‍याचा वेगही वाढल्याने मच्छीमार बंदरांवर परतले, अशी माहिती मच्छीमारांनी दिली.अरबी समुद्रातील (Arbian sea) कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होऊ शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत.

Cyclone Orange alert at Ratnagiri Sindhudurg kokan update marathi news

कुलाबा येथील प्रादेशिक वेधशाळेतर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अति मुसळधार पाऊस दोन्ही जिल्ह्यात पडू शकतो. हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानंतर मच्छीमारांनाही त्याचे संकेत मिळू लागले आहेत. चक्रीवादळ रविवारी (ता. 16) धडकण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे.

चक्रीवादळाचा संदेश फिरु लागल्यानंतर सुरक्षिततेसाठी मच्छीमार किनार्‍याच्या दिशेने परतू लागले आहेत. वेगवान वार्‍यामुळे बोटींचे नुकसान टाळण्यासाठी त्या बंदराला बांधून ठेवल्या जात आहेत. खोल समुद्रामधून परतणार्‍या मच्छीमारांनाही वादळाचे संकेत मिळत आहेत. किनार्‍यावर वार्‍याचा वेग नेहमीपेक्षा वाढला आहे. नेहमीपेक्षा उंच लाटा उसळू लागल्या आहेत; मात्र वादळ कर्नाटकच्या दिशेने येत असले तरीही सध्या मुंबईच्या दिशेने वारे वाहत असल्यामुळे वादळाची दिशा मध्येच बदलण्याची शक्यताही वर्तविली जात आहे, याला मच्छीमार अभय लाकडे यांनीही दुजोरा दिला आहे.

वादळाचा धोका, मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट

सतर्कतेच्या सूचना दिल्या

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रात जावू नये, बोटींचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित बांधून ठेवाव्यात, अतिवृष्टीचे पाणी घरामध्ये घुसणार नाही याची खात्री करा, घर मोडकळीस आलेल्या स्थितीत असेल तर सुरक्षितस्थळी स्थलांतर करा, घराच्या बाजूला पडणार्‍या वस्तू असतील तर त्यापासून लांब रहा, पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना सुरक्षित स्थळी हलवा, उजेडासाठीची यंत्रणा सज्ज ठेवा, समुद्र किनारी व नदीकिनारी राहणार्‍यानी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कोविडचे रुग्ण मिसळणार नाहीत याची काळजी घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com