
-अमित गवळे
पाली : विधायक व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काहीजण पुढाकार घेत आहेत. पालीतील अंबिके कुटुंबीयांनी गणरायासमोर जागतिक वारसा मिळालेल्या बारा किल्ल्यांचा देखावा केला आहे. रोहा तालुक्यातील कोलाड येथील सागर दहिंबेकर यांनी फळे फुले वर्षावनांचा देखावा केला आहे. तर रोहा तालुक्यातील वांगणी येथील शिर्के कुटुंबियांनी मराठी शाळा व भाषेसाठी जनजागृती करण्यासाठी देखावा बनवला आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन तर होतेच मात्र जनजागृती व प्रबोधन देखील होत आहे.