
ओरोस (सिंधुदुर्ग) : केंद्र व राज्य शासनाने केलेल्या उपाय योजनेवर विसंबुन न राहता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत तब्बल १ कोटी ४२ लाख ४९ हजार ३९८ रुपयांची औषधे व साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ९३ लाख ५८ हजार २७३ रुपयांची औषध खरेदी तर ४८ लाख ९१ हजार १२५ रुपयांची साधन सामुग्री खरेदी करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणुमुळे उपलब्ध केलेल्या साधन सामुग्री व औषधे यांचा तितका उपयोग होत नाही. हा आजार नवीन आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी औषधे व साहित्य हे वेगळ्या स्वरूपाचे आहे. केंद्र व राज्य शासनाने आपल्या स्तरावर बदललेल्या या औषध व साहित्याची उपलब्धता जिल्हा स्तरावर करून दिली आहे. पण ती तोकडी पडत आहे. परिणामी जिल्हास्तरावर याची उपलब्धता करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आपल्या स्तरावर ही साधन सामुग्री व औषधे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. आ नितेश राणे, आ दीपक केसरकर व जिल्हा वार्षिक निधीतून प्राप्त झालेला निधी यासाठी खर्च घालण्यात येणार आहे
जिल्हा वार्षिकच्या 75 लाख निधीतून औषधे, साहित्य खरेदी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्हा नियोजनच्या जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या ७५ लाख १८ हजार ६९८ रूपये निधीतून साधन सामुग्री व औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ४८ लाख ९१ हजार १२५ रूपये निधीतून साधन सामुग्री खरेदी करण्यात येणार आहे. तर २६ लाख २७ हजार ५७३ रूपये निधीतून औषधे खरेदी करण्यात येणार आहेत.
हेही वाचा- मास्क न वापरणाऱ्या 264 जणांवर कारवाई
आ. केसरकर, आ राणे यांच्या निधीतून औषध खरेदी
आ दीपक केसरकर यांच्या आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून औषध खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी आ केसरकर यांनी ३३ लाख ९७ हजार रूपये एवढा निधी दिला आहे. आ नितेश राणे यांच्या आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतूनही औषध खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी त्यानी ३३ लाख ३३ हजार ७०० रूपये एवढा निधी दिला आहे. दोन्ही आमदारांचा मिळून ६७ लाख ३० हजार ७०० रूपये निधी खर्च करण्यात येणार आहे.
हेही वाचा- सावधान ! लॉकडाऊन मध्ये गाडी लॉक ठेवू नका. -
ही औषधे, साहित्य करणार खरेदी
जिल्हा परिषद १ कोटी ४२ लाख ४९ हजार ३९८ रूपये खर्च करून हे साहित्य व औषधे खरेदी करणार आहेत. यात एन ९५ मास्क, पीपीई किट, डिस्कॉजबल कॅप, पीपल लेअर फेस मास्क, स्टरलाइज ग्लोज, हँड सॅनिटायझर, थर्मल स्कॅन हे साहित्य खरेदी केले जाणार आहे. ऍनीकॅसिन इंजेक्शन, ऍन्लो डेपिन गोळ्या, ऍमोक्सी सायक्लीन कॅप्सुल अशी एकूण १६ प्रकारची औषधे खरेदी करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.