

Forgery-Based ₹12 Lakh Fraud Unearthed; Ratnagiri District in Turmoil
Sakal
रत्नागिरी: नऊ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत तयार करून १२ लाखांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज लक्ष्मण जाधव (रा. आकार अमृतवेल, नाचणे रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ११ डिसेंबर २०२३ ते १६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली आहे.