

Fishermen Grapple with ₹1 Lakh Extra Burden Amid Surge in Fuel Prices
sakal
दापोली: इराण आणि अमेरिका यांच्यातील जागतिक तणावाचे थेट पडसाद आता कोकण किनारपट्टीवर उमटू लागले आहेत. डिझेलच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, हर्णैसह परिसरातील मच्छीमार हवालदिल झाले आहेत. दरवाढीमुळे मच्छीमारांवर महिन्याला सुमारे ९० हजार ते १ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. वाढत्या खर्चामुळे आता समुद्रात जाणे परवडणारे नसल्याने अनेकांनी आपल्या बोटी किनाऱ्यावरच उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे.