'या नगराध्यक्षाचे बिघडले संतुलन' .. कोण म्हणाले वाचा..

form the city delopment plan Blame recrimination in malvan kokan marathi news
form the city delopment plan Blame recrimination in malvan kokan marathi news

 मालवण (सिंधुदुर्ग) : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कलंकित बनलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे संतुलन बिघडले आहे. त्यांच्यात जर खरीच धमक असल्यास त्यांनी राजीनामा देऊन पोटनिवडणुकीस सामोरे जावे. दूध का दूध और पाणी का पाणी होईल असे आव्हान माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 

शहर विकास आराखड्यावरून आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. नगराध्यक्षांनी केलेल्या टीकेला श्री. आचरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, नगराध्यक्षांनी पालिकेला माया जवळ करण्याचे दुकान बनविले आहे. त्यांनी लाज भाजून खाल्ली असेल मात्र जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी लाज बाळगायला हवी. ज्या पालिकेत त्यांनी काम केले त्या पालिकेला ते न्याय देऊ शकले नाहीत त्यामुळे ते सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार? काही दिवसांपूर्वी पालिकेत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नगराध्यक्षांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर सादर झाले.

पालिकेला माया जवळ करण्याचे दुकान

100 वर्षाच्या इतिहासात पालिकेची पहिल्यांदाच मानहानी, बदनामी झाली. पालिकेला काळिमा फासण्याचे कृत्य नगराध्यक्षांनी केले. पालिकेत लिपीक म्हणून सेवा बजावलेल्या नगराध्यक्षांकडे आलिशान गाड्या, अन्य शहरात फ्लॅट घेण्याएवढी संपत्ती आली कुठून? ज्या मंदिरात जनतेची सेवा केली जाते त्या पालिकेचे दुकान करण्याचे काम त्यांनी केले आहे. नगराध्यक्षांना फार इगो आहे. आपण कोण होतो याचे भान ठेवून आपली कुवत त्यांनी ओळखावी, असा टोलाही आचरेकर यांनी लगावला.

नगराध्यक्षांकडे एवढी संपत्ती आली कुठून?
विकास आराखड्याचा आधार घेऊन सत्तेत आलेल्यांना आता विकास आराखड्याचा विसर पडला आहे. शहराशी कोणतेही प्रेम, आस्था नसल्याने साडे तीन वर्षे फक्त आराम करून दौरेच नगराध्यक्ष करत आहेत. आता कार्यकाल संपत आला असून सुरू केलेल्या दुकानाची लिजही संपत आली आहे. त्यामुळे लवकरच बाेजाबिस्तर गुंडाळून आपले पार्सल पुण्याला पाठविण्याची व्यवस्था केली आहे, असा टोला आचरेकर यांनी लगावला.

हेही वाचा- सत्ताधारी एवढे घाबरले का? यातच कुठेतरी पाणी मुरतंय... कोण म्हणाले वाचा...
ते म्हणाले, माझे राजकीय भवितव्य तमाम मालवणवासीयांच्या हातात आहे. म्हणूनच 25 वर्षे नगरसेवक आणि पाचवेळा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी विराजमान केले. या दरम्यान भले भले आले आणि येऊन गेलेही. सर्वांचे मनसुबे उधळले. मात्र मी राजकारणात आहे तिथेच आहे. कुणाचे राजकीय पेकुट घेऊन मी राजकारण करत नाही. मी स्वयंप्रकाशित आहे, असा टोला आचरेकर यांनी लगावला. शहर विकास आराखड्यातील रस्ते अवास्तव पद्धतीने वाढवून अनेक ठिकाणी आरक्षणे टाकण्याचे काम तसेच अनेक नवे रस्ते टाकण्याचे षडयंत्र नगराध्यक्षांनी केले.

नगराध्यक्षांनी सज्ज राहावे

शहर बेचिराख करण्याचे कृत्य त्यांनी केले आहे. राज्यमार्ग 118 रस्ता रुंदीकरण प्रश्नी राम मंदिर, एसटी येथील नागरिकांनी भरसभेत केलेल्या प्रश्नाच्या भडीमाराने नगराध्यक्षांची भंबेरी उडाली. अशा स्थितीत संपूर्ण शहरातील जनतेचा मोर्चा पालिकेवर धडकला तर नगराध्यक्षांची काय हालत होईल याचा विचार करून त्यांनी सज्ज राहावे, असा आव्हानात्मक टोलाही आचरेकर यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com