
येत्या अधिवेशनात भाजपा सरकारला जागे करणार आहे. मात्र त्या अनुषंगाने उद्या 25 रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्यात तहसील कार्यालयासमोर भाजपा धरणे आंदोलन छेडणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी केला सिंधुदुर्गवर अन्याय : राजन तेली
सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : फडणवीस सरकारने बजेट प्रयोजन करून मंजुरी दिलेल्या कामांना ठाकरे सरकारने स्थगिती देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे याबाबत येत्या अधिवेशनात भाजपा सरकारला जागे करणार आहे. मात्र त्या अनुषंगाने उद्या 25 रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्यात तहसील कार्यालयासमोर भाजपा धरणे आंदोलन छेडणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर श्री तेली यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस मधुसूदन बांदिवडेकर, अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, सहकार सेलचे कमलाकांत कुबल, मंडल तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भांबुरे, महेश धुरी, संदीप गावडे, पंचायत समिती सदस्य रविद्र मडगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, दादू कविटकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा- मध्यप्रदेशातील अपघातात चिपळूणातील या जवानाला गमवावे लागले प्राण....
शेतकऱ्यावर केला अन्याय
श्री तेली म्हणाले; शासनाने शेतकऱ्यावर अन्याय करत कर्जमाफी बाबत दिलेला शब्द न पाळता त्यांना हेक्टरी 25 हजार जाहीर केलेले अनुदान व फळ बागायतदारांना हेक्टरी 50 हजार अनुदान प्रत्यक्षात शासनाकडून देण्यात येणाऱ्या कर्जमाफीत कुठेच दिसत नाही. शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत कुठलाच उल्लेख नाही त्यामुळे अशा अनेक अडचणी कर्जमाफी समोर आले आहेत. खावटी कर्ज बाबत अध्यादेश निघेपर्यंत कर्ज माफ होते मात्र आताच्या सरकारने याबाबत कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. या सर्व गोष्टीचा जाब विचारला जाणार आहे.
हेही वाचा- हापूस खायचा आहे मग दया पाच ते नऊ हजार रुपये...
रस्त्यांच्या कामांची मंजुरी थांबवली
ते पुढे म्हणाले;सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने फडणवीस सरकारने बजेट प्रयोजन करून रस्त्यांच्या कामांना दिलेली मंजुरी थांबवली असून यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे रखडली आहेत प्रधान सचिव यांच्या अंतर्गत येणारे रस्ते तसेच 25,15 च्या अंतर्गत येणारे रस्ते आदी रस्त्याची कामे यामध्ये अडकून पडली आहेत. मात्र सध्याची स्थिती पाहता काही ठराविक ठेकेदारांकडून जिल्ह्यातील महत्वाची कामे आधीच काढून घेण्यात आली आहेत. अशी कामे अडवून ठेवल्याने ती वेळेत पूर्ण होत नाहीत आणि याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे .यामागे सत्ताधारी व अधिकारी वर्गाचे संगनमत असून याचा जाब लवकरच विचारण्यात येणार आहे.
हेही वाचा- फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा...
मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यावर केला अन्याय
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज सोडा पण ज्या कामांना स्थगिती दिली तेव्हा ठेवली जाईल अशी अपेक्षा होती परंतु मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यावर त्यांची घोर निराशा केली. चांदा ते बांदा ही महत्त्वपूर्ण योजनेचा बट्ट्याबोळ येथील माजी पालकमंत्र्यांनी लावला त्यापेक्षा ही योजना बंद करून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यावर एक प्रकारे अन्याय केला. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग साठी नव्याने घोषणा केलेली सिंधुरत्ना विकास योजना कुठल्या पद्धतीने राबवणार, त्याच्यासाठी बजेटचे काय नियोजन याबाबत काहीच निश्चिती नसताना जिल्हावासीयांना फसविण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे ज्या चुका ठाकरे सरकारकडून करण्यात आले आहे त्या चुका जनतेच्या नजरेत आणून देण्याचे काम उद्याच्या धरणे आंदोलनातून करण्यात येणार आहे.