रत्नागिरी : जिल्ह्यात ३ हजार ४८ बेडची तयारी

ओमिक्रॉनसाठी आरोग्य विभाग सज्ज ; २५० जणांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर
ओमिक्रॉनसाठी आरोग्य विभाग सज्ज ; २५० जणांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर
ओमिक्रॉनसाठी आरोग्य विभाग सज्ज ; २५० जणांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादरsakal

रत्नागिरी : ओमिक्रॉन विषाणू आणि तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. ओमिक्रॉनचा प्रदुर्भाव झपाट्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात ११ ऑक्सिजन युनिटसह ३ हजार ४८ बेडची तयारी ठेवली असली तरी मनुष्यबळाचा प्रश्न गंभीर आहे. वर्ग १ ते ४ पर्यंतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या २५० जणांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी ४ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात सुरू आहे; मात्र कोरोनाचा जगभरातील मुक्काम वाढत असल्याने त्याचे व्हेरिएंट निर्माण होत आहे. पहिल्या कोरोना विषाणूनंतर डेल्टाप्लसने जगभरात हाहाकार माजवला होता. जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा सर्वाधिक बसला. आता जिल्हा आरोग्य यंत्रणा 'ओमिक्रॉन'चा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ओमिक्रॉनसाठी आरोग्य विभाग सज्ज ; २५० जणांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर
औरंगाबाद : बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश

जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन निर्मितीची ११ युनिट कार्यरत आहेत. दुसऱ्या लाटेच्या सुरवातीला जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जणवला होता. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युनिट उभारण्यात आली. ती पुन्हा कार्यरत करण्याचे तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत १७ मे रोजी एकाच दिवशी तब्बल २७ मेट्रिक टन ऑक्सिजन लागला होता. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ऑक्सिजनच्या दीडपट ऑक्सिजन उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.

पीएसए वर्गातील ११ युनिटमधून ८.३५ मेट्रिक टन, एलएमओ वर्गातील एका युनिटमधून ९२.४७ मेट्रिक टन, ऑक्सिजन सिलेंडरमधील २६४ बी टाईपमधून ०.५१ मेट्रिक टन, ११६८ डी टाईपमधून १०.६१ मेट्रिक टन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमधून ५.०७ असे एकूण ११७.२१ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरचे २४४ बेड, आयसीयूमध्ये नॉनव्हेंटिलेटरचे २४४ बेड, ऑक्सिजन असलेले १ हजार ३६ बेड, तर ऑक्सिजन नसलेले १ हजार ५२४ बेड जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये तयार ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी ६३.८४ मेट्रिक टन ऑक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता असून ऑक्सिजनचा आवश्यक साठा सध्या उपलब्ध असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

ओमिक्रॉनसाठी आरोग्य विभाग सज्ज ; २५० जणांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर
रत्नागिरी : जिल्ह्यातील ३४ एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नागरिकांनी सतर्क राहावे : डॉ. फुले

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय घातक आहे, असे शास्त्रज्ञांच्या सूचनेवरून लक्षात येत आहे. त्याचे ५२ नुट्येशन आहेत. तो एका व्यक्तीकडून ७० जणांना बाधित करतो. 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटचा पसरण्याचा वेग जास्त असल्याने नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरच्या वापरासह दक्षता घेणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटसाठी आवश्यक औषधे जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र सतर्क राहावे, असे आवाहन डॉ. संघमित्रा फुले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com