esakal | राजापुरात पुन्हा पूर; नदीत वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, एकजण बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरात पुन्हा पूर; नदीत वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, एकजण बेपत्ता

राजापूर - गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू आहे. यामुळे दुसऱ्यांदा राजापूरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील चिंचबांध, बंदरधक्का परिसर पाण्याखाली गेला आहे. तर, शीळ-गोठणेदोनीवडे रस्ताही पाण्याखाली गेला आहे. दरम्यान,  तालुक्यातील आडवली येथील रघुनाथ नारायण कोकाटे यांचा वहाळाच्या पुरात वाहुन मृत्यु झाला तर मुर येथील शांताराम बाबुराव साळवी हे बेपत्ता झाले आहेत.

राजापुरात पुन्हा पूर; नदीत वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, एकजण बेपत्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर - गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू आहे. यामुळे दुसऱ्यांदा राजापूरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील चिंचबांध, बंदरधक्का परिसर पाण्याखाली गेला आहे. तर, शीळ-गोठणेदोनीवडे रस्ताही पाण्याखाली गेला आहे. दरम्यान,  तालुक्यातील आडवली येथील रघुनाथ नारायण कोकाटे यांचा वहाळाच्या पुरात वाहुन मृत्यु झाला तर मुर येथील शांताराम बाबुराव साळवी हे बेपत्ता झाले आहेत.

राजापूर परिसरात पूरस्थिती..(फोटो फिचर पाहण्यासाठी क्लिक करा)

आडवली येथे मुसळधार पावसामुळे वहाळाला पुर आला होता. कोकाटेवाडीतील रघुनाथ नारायण कोकाटे (५३) हे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास वहाळावर गेले होते. ते पाण्यात पडल्याने वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावापासुन काही अंतरावर सापडला. 

दरम्यान तालुक्यातील मुर येथे शांताराम बाबुराव साळवी (८०) हे मंगळवारपासुन बेपत्ता आहेत. अर्जुना नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सुतारवाडी येथील मुलीकडे चालले होते. त्यांना नदीच्या आसपास काहींनी अखेरचे पाहिले होते. 

दरम्यान, राजापूरातील कोदवली नदीच्या काठावरील टपऱ्या पुराच्या पाण्यात गेल्या आहेत. आज दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने पुराचे पाणीही वाढत आहे. शहरातील शिवाजी पथ रस्त्यावरील चिंचबांध, बंदरधक्का परिसर रात्री पाण्याखाली गेले. शहरानजीकच्या शीळ - गोठणेदोनीवडे रस्तावरही पाणी आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. पावसाची सततधार कायम असल्याने पाण्यामध्ये वाढच होत आहे.

कोकणातील अन्य बातम्या

राजापूर : मूर खिंडीत कोसळली दरड 

सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प 
 
loading image
go to top