‘मी आमदार बोलतोय'...तोतयाने केला काॅल अन्....

MLA unfounded calling in panhala kolhapur marathi news
MLA unfounded calling in panhala kolhapur marathi news

पन्हाळा (कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्‍यातील एका शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याची बदली करण्याबाबत आमदारांच्या एका कार्यकर्त्याने ‘मी आमदार बोलतोय...‘  असा दमदार आवाज काढत नोंदणी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ‘उद्या ही महिला अधिकारी पन्हाळयात दिसता कामा  नये, मी आमदार आहे, याचे भान असू दे, तुम्हाला तालुक्‍यात काम करायचे आहे की नाही ?’ असा चक्‍क दम दिला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शब्दाला किंमत देत आमदारांच्या आवाजाची खात्री न करता, त्या महिला अधिकाऱ्याची आमदारांच्या दूरध्वनी संदेशावरून मुख्य कार्यालयाकडे बदली केली.दरम्यान, आमदारांच्या नावे केलेल्या दूरध्वनीचे रेकॉर्डिंग करण्यात आल्याने आणि खात्रीसाठी तो दूरध्वनी कोणाचा होता, याची पडताळणी केली असता तो आवाज आमदारांचा नसल्याचे स्पष्ट झाले. 

‘मी आमदार बोलतोय...‘  असा दमदार आवाज
माजी कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद सांभाळलेले आमदार अशी दमबाजी करणार नाहीत, याची सर्वांनाच खात्री होती, तरीही या आवाजाचे रेकॉर्डिंग आमदारांच्या पीएंना पाठविण्यात आले. त्यांनीही खात्री करून ही बाब आमदारांच्या कानी घातली. आमदारही अचंबित झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवाजाची खात्री न करता बदली आदेश काढलाच कसा? असा जाब विचारत त्यांना धारेवर धरले. तसेच ज्यांनी आपल्या नावाचा वापर करून दूरध्वनी केला त्याच्यावर कारवाई 
करण्यास सांगितले.

आवाजाची खात्री न करता बदली आदेश काढला
ज्याने बोगस नावाने दूरध्वनी केला, त्याची चौकशी होईल, कारवाई होईल  हा भाग वगळता चक्‍क आमदारांचे नाव घेऊन  जिल्हयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावण्यापर्यंत एखाद्याची मजल जातेच कशी, त्यामागचे नेमके कारण काय याचीच चर्चा पन्हाळा तालुक्‍यात  सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com