esakal | आता चाखा कोकणचा अस्सल मध
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur-Honey

कोकणातील फळबागायतदारांना शेतीपुरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन करण्याची चांगली संधी आहे.

आता चाखा कोकणचा अस्सल मध

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : जिल्ह्यातील वाघेरी येथील मायोफा अ‍ॅग्रोटेकने मधुमक्षिका पालन क्षेत्रात क्रांतीकारक पाऊल टाकले आहे. आतापर्यंत सरसकट मधनिर्मिती करणारी ही संस्था भविष्यात जांभुळ मध, आंबा मध, काजू मध, कांदळवन मध, कारवी मधाची निर्मिती करणार आहे. एवढेच नव्हे तर पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांवर देखील पेट्या स्थंलातराचा पर्याय अवलंबणार आहे. त्यामुळे कोकणातील फळबागायतदारांना शेतीपुरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन करण्याची चांगली संधी आहे.

बदलत्या वातावरणामुळे कोकणातील फळबागायतदार चिंतेत आहेत. त्यामुळे फळबागांसोबत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची जोड मिळाली तर त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. मधाला आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व आहे. मधाला देशभरात मोठी मागणी आहे. या हेतूने मधुमक्षिकापालन क्षेत्रात गेल्या काही महिन्यापासून काम करणाऱ्या मायोफा ग्रोटेकने मधनिर्मिती क्षेत्रात यशस्वी काम सुरू केले आहे. मधुमक्षिका पालन करताना कोकणात येणाऱ्या अडचणीवर त्यांनी अभ्यासपूर्ण मात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या संस्थेने आणि बँक ऑफ इंडिया रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालनांचे प्रशिक्षण दिले आहे; परंतु त्यापेक्षा महत्वपूर्ण आणि क्रांतीकारक पाऊल पुढील काळात टाकले जाणार आहे. कोकणातील आंबा, काजू, जांभुळ, कोकम, कारवी, कांदळवनामध्ये पेट्या ठेवून तशाप्रकारची मधनिर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील काही राज्यात विशेषतः उत्तरप्रदेशात अशा प्रकारे मधनिर्मिती केली जाते. त्यामुळे कोकणातील या फळबागांमधून निर्मित मधाला मोठी मागणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: चिपळूण : कुंभार्ली घाटात दरड कोसळली

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मध खरेदीची हमी देखील ही कंपनी घेणार आहे. कोकणात पावसाळ्यात धो-धो पडणाऱ्या पावसामुळे मधुमक्षिका पालनात अडथळे येतात. त्यामुळे पाऊस कमी असलेल्या भागात मधमाश्यांचे स्थंलातर करण्याचा पर्याय देखील अवंलबिण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील फळबागायतदारांना शेतीपुरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. फळबागांमध्ये मधुमक्षिकांच्या वावरामुळे फुलांचे परागीकरण चांगले होवुन चांगल्या प्रकारची फळधारणा होण्यास मदत होणार आहे.

असा ओळखला जातो मध

ज्या फळपिकांच्या बागेत मधुमक्षिकांची पेटी लावलेली असते. त्या सापळ्यांमध्ये मधमाशीच्या पायाला लागलेले परागकण ७० टक्के पडतात. त्यातून निर्मित झालेल्या मधाला त्या वनस्पतीच्या फळाच्या नावाने ओळखले जाते.

हेही वाचा: रत्नागिरी: आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प

मधमाश्यांच्या जाती

एपिस सेराना, एपिस डोर्साटा, एपिस मेलिफेरा, एपिस फ्लोरिया, एपिस अँड्रेनिफॉर्मिस, एपिस कोशेव्ह्निकोव्ह आणि एपिस लेबरिसा या मधमाश्यांचा जाती आहेत.

मधाला आयुर्वेदात महत्वाचे स्थान

* धार्मिक कार्य, सौंदर्य प्रसाधने, आहारातही वापर

* औषधी गुणधर्मामुळे मधाला कायाकल्पक म्हणून संबोधले जाते

* पुढील सहा महिन्यांत अनेक प्रशिक्षण वर्गाचे नियोजन

* आंबा, काजू, जांभूळ, कोकम बागेमध्ये मधुमक्षिका पालन

* ...तर मधविक्रीची जबाबदारी कंपनी स्वीकारणार

हेही वाचा: महंगाई डायन खाए जात है! सलग सातव्या दिवशी इंधन दरवाढ

- ‘मायोफा’मार्फत १० दिवसांचे मोफत प्रशिक्षण

- आतापर्यंत ३५६ जणांना प्रशिक्षण

"सिंधुदुर्गामध्ये आंबा, काजू, जांभूळ, कोकम, कारवी, कांदळवन तसेच विविध फुलांच्या मधासारखे मध बनवण्याचे सामर्थ्य आहे. मधपेट्या शेतात ठेवल्यामुळे परागीकरणाची प्रकिया जलद होवुन उत्पादनही वाढेल. मधुमक्षिका पालनातून पुरक व्यवसायाची संधी आहे."

- आशिष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, मायोफा ग्रोटेक

हेही वाचा: ढिंग टांग : दिसते मजला सुखचित्र नवे..!

"मायोफा ग्रोटेकच्या माध्यमातून शुद्ध आणि भेसळ मुक्त अन्न तयार करणे आणि ते सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. याचबरोबर सेंद्रीय शेती आणि शेतीपुरक उद्योगांमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत."

- विशाल राणे, संचालक, मायोफा ग्रोटेक

loading image
go to top