Karnataka Faster Boat
Karnataka Faster Boatesakal

Ratnagiri : कर्नाटकच्या 'त्या' नौकेला 16 लाख 10 हजारांचा दंड; मत्स्य विभागाची मोठी कारवाई, असं नेमकं काय घडलं?

मत्स्य विभागाने पकडलेल्या त्या परराज्यातील ट्रॉलर्स्ला पाचपट दंड आकारला आहे.
Summary

महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मासेमारी करु नये असा संदेश परराज्यातील मच्छीमारांना देण्यात आला आहे.

रत्नागिरी : जिल्ह्याच्या हद्दीत समुद्र किनाऱ्यापासून आठ ते दहा वावात घुसखोरी करून मासेमारी करताना रत्नागिरीच्या मत्स्य विभागाकडून (Ratnagiri Fisheries Department) कारवाई केलेल्या कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलरला (Karnataka High Speed Trawler Faster Boats) पाच पट दंड आकारला आहे. सुमारे १६ लाख १० हजार रुपयांचा दंड केल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.

तसेच परराज्यातील ट्रॉलर्स्वर अंकुश लावण्यासाठी स्थानिक मोठ्या मच्छीमारांच्या वेगवान नौकांचे साह्य घेण्याची तयारीही मत्स्य विभागाकडून केली आहे. मागील आठवड्यात १० नोव्हेंबरला रात्री गस्त घालताना समुद्रात ८ ते १० वावामध्ये महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात कर्नाटकातील सुमारे ३० ते ३५ हायस्पीड नौका मासेमारी करत असल्याचे लक्षात आले होते.

Karnataka Faster Boat
ऊसदराचा दोन दिवसांत निर्णय द्या, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखणार; राजू शेट्टींचा कारखान्यांना कडक इशारा

कमी आस असलेल्या जाळ्यांचा वापर करून लहान-मोठी मासळी त्यांच्याकडून मारली जात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी स्थानिक मच्छीमारांकडून होत आहे. त्या फास्टर नौकांवर कारवाई करताना गस्तीपथकाला घेरोओ घातला होता; परंतु त्याही परिस्थितीमध्ये गस्ती पथकाने श्री नित्यानंद नावाच्या फास्टर नौकेला पकडण्यात यश आले. त्यावर सात खलाशी आणि एक तांडेल आहे.

ती नौका मिरकरवाडा बंदरात आणून स्थानबद्ध केली होती. त्यावर २ लाख ६१ हजार रुपयांची मासळी होती. त्यांच्याविरोधात सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे सुनावणी घेण्यात आली. नौकेवर मिळालेल्या मासळीच्या ५ पट दंडासह जाळ्यांचा लहान आकारासाठी मिळून त्या नौका मालकाला १६ लाख १० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. हा दंड तात्काळ वसुलही केला आहे. या कारवाईमुळे कोकणात येऊन मासेमारी करणाऱ्या पराज्यातील ट्रॉलर्स्ना अंकुश बसणार आहे.

Karnataka Faster Boat
IND vs AUS ICC World Cup 2023 Final : रोहित शर्मा-राहुल द्रविडची 'रोरा'वणारी जोडी

अजुनही काही परराज्यातील नौका येत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर रोख लावण्यासाठी मत्स्य विभागाकडून प्लॅन तयार केला आहे. मत्स्य विभागाची गस्तीनौका साधी असल्यामुळे जिल्ह्यातील वेगवान फास्टर नौकांची मदत घेऊन पराज्यातील नौकांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचे नियोजन सुरु असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Karnataka Faster Boat
Loksabha Election : प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी; माजी मुख्यमंत्र्यांनाच बड्या नेत्यांचा विरोध

महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मासेमारी करु नये असा संदेश परराज्यातील मच्छीमारांना देण्यात आला आहे. ते ट्रॉलर्स् मासेमारी करून गेल्यानंतर गिलनेटसह छोट्या-मोठ्या मच्छीमारी नौकांना मासेच मिळत नाहीत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.

मत्स्य विभागाने पकडलेल्या त्या परराज्यातील ट्रॉलर्स्ला पाचपट दंड आकारला आहे. भविष्यात अशा नौका किनारी भागात आल्याच तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

-अभयसिंह शिंदे-इनामदार, सहायक मत्स्य आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com