सुसंस्कृत भावी पिढी घडविणारे शिक्षकी हात घडवितात आकर्षक गणेशमूर्ती

सुसंस्कृत भावी पिढी घडविणारे शिक्षकी हात घडवितात आकर्षक गणेशमूर्ती
Summary

गणेशमुर्तीकार म्हणून कोणताही पारंपारीक वारसा नसताना उपजत कलागुण, कौशल्याला व्यवसायिकतेची जोड देत मुर्तीकलेतील आवड त्यांनी जोपासली आहे.

राजापूर (रत्नागिरी): तालुक्यातील सोलगावचे सुपूत्र आणि ओणी येथील नुतन विद्यामंदीर प्रशालेतील कलाशिक्षक काशिनाथ चंद्रकांत गुरव अंगभूत असलेली उपजत मुर्तीकला जोपासत आहेत. शिक्षकी पेशाच्या माध्यमातून संस्कृत भावी पिढी घडविणार्‍या काशिनाथ यांच्या हातांनी ‘अक्षरशिल्प’ गणेश कार्यशाळेमध्ये गेल्या नऊ वर्षापासून वैशिष्ट्यपूर्ण गणेशमुर्ती घडत आहेत. गणेशमुर्तीकार म्हणून कोणताही पारंपारीक वारसा नसताना उपजत कलागुण, कौशल्याला व्यवसायिकतेची जोड देत मुर्तीकलेतील आवड त्यांनी जोपासली आहे.

सुसंस्कृत भावी पिढी घडविणारे शिक्षकी हात घडवितात आकर्षक गणेशमूर्ती
रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण शून्यावर

सोलगावचे सुपूत्र काशिनाथ यांनी ‘आर्ट टिचर डिप्लोमा ’ आणि ‘आर्ट मास्टर’ हे अभ्यासक्रम पूर्ण करून गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील ओणी येथील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नुतन विद्यामंदीरमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या ठिकाणी शिक्षकीपेशा सांभाळताना त्यांनी अंगभूत असलेली मुर्तीकलाही जोपासली आहे. मुर्तीकलेतील कोणताही पारंपारीक वारसा नसतानाही केवळ आवड म्हणूम देवाचेगोठणे येथील प्रसिद्ध मुर्तीकार संजय नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गणेश मुर्ती घडविण्याला सुरूवात केली.

सुसंस्कृत भावी पिढी घडविणारे शिक्षकी हात घडवितात आकर्षक गणेशमूर्ती
रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सांगलीसाठी कोल्हापुरात एनडीआरएफचा कॅम्प

काही दिवस त्यांच्या मुर्तीशाळेमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्यानंतर स्वतःच्या घरी पहिल्यांदा अडीच फूट उंचीची ’लालबागचा राजा’ गणेशमुर्ती घडविली अन् तेथून खर्‍या अर्थाने गणेश मुर्तीकार म्हणून प्रवास सुरू झाल्याचे काशिनाथ सांगतात. हाती तयार केलेल्या मातीच्या मुर्तीसह साच्यातील अशा शंभरहून अधिक मुर्ती ते घडवितात. गणेश मुर्तीकार घडण्यामध्ये गुरूवर्य संजय नाटेकर, राजापूरचे बाळा तांबट, कैलास कोठारकर आदींचे मार्गदर्शन तर, व्यवसायामध्ये आई-वडीलांसह पत्नी स्पृहा, दर्पण फाटक, निमेश गुरव, राहुल गुरव, संदीप गुरव, हरेश नरसुले यांचे सहकार्य लाभत असल्याचे ते सांगतात.

सुसंस्कृत भावी पिढी घडविणारे शिक्षकी हात घडवितात आकर्षक गणेशमूर्ती
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिस्तुलाच्या धाकाने अपहरण

बालमुर्ती’ची खासियत

काशिनाथ यांच्या अक्षरशिल्प’ गणेश कार्यशाळेची आकर्षक रंगसंगती आणि विविधांगी पोझिशनमधल्या ’बालमुर्ती’ ही खासियत आहे. एक ते दोन फूट उंचीच्या ह्या गणेशमुर्ती असून त्यांची रंगसंगती आणि पोझिशन गणेशभक्तांचे मन हरखून जाते. त्यातच, डोळ्यांची रेखणी, साजेसे लक्षवेधी रंगकाम हेही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. टाकावू वस्तूंपासून टिकाऊ अन् आकर्षक वस्तू तयार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्याची झलक अनेक कार्यक्रमामध्ये दिसत असून त्यांनी तयार केलेल्या विविधांगी वस्तूंचे मान्यवरांनी अनेकवेळा कौतुक केले आहे.

सुसंस्कृत भावी पिढी घडविणारे शिक्षकी हात घडवितात आकर्षक गणेशमूर्ती
रत्नागिरी जिल्ह्यात २१५ गावे काळोखात; पुराचा फटका

सदैव मदतीसाठी पुढे

राजापूर तालुका मुर्तीकार संघटनेचे सचिव असलेले काशिनाथ गुरव यांचा मुर्तीकार संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील मुर्तीकारांना नेहमीच मदतीचा अन् सहकार्याचा हात राहीला आहे. त्याप्रमाणे नवमुर्तीकारांना घडविण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. त्यामध्ये भू येथील नरेश मांडवकर, सोलगाव येथील कल्पेश बाणे, धाऊलवल्ली येथील भूषण वेलये, कशेळी येथील आदीत्य राडये या नवमुर्तीकारांना घडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहीला आहे. या नवमुर्तीकारांना रंगकाम, रंगछटा देण्यासह माती कामासंबंधित काशिनाथ यांनी मार्गदर्शन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com