Kokan : जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन

शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत झोपेचे सोंग : सागर पाटील
Kokan news
Kokan newsesakal

रत्नागिरी : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन यांना उतारवयामध्ये वाऱ्यावर सोडून देते. पाच वर्षांसाठी निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना जुनी पेन्शन योजना लागू केली जाते; परंतु आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा काळ शासन सेवेत घालवणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सक्तीने एनपीएस योजना स्वीकारावी लागत आहे. या विरोधात रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने धरणे आंदोलन केले.

Kokan news
Kokan : जिल्ह्यात विकास संस्थांनी उलाढाल वाढवावी

जि. प. शिक्षण विभागासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना संबोधित करताना अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील म्हणाले, अध्यापक संघाचे एकच मिशन असून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे. शिक्षणक्षेत्रातील खासगीकरण हा बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आहे. वाडी, वस्तीवरील शाळा बंद करण्याच्या अविचारी निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करणे आवश्यक आहे. शिक्षक व शिक्षणक्षेत्राबद्दल शासनामध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था पाहायला मिळत असून शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते यांनी सांगितले,.शासनाने शिक्षकाच्या जाती निर्माण केल्या. जिल्हा सचिव रोहित जाधव यांच्यासह अनेक एनपीएसधारक कर्मचाऱ्यांनी सडेतोड भूमिका व्यक्त केली. या वेळी अध्यापक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत यांच्यामार्फत शिक्षणमंत्री दीपक केसरकर व राज्याचे अप्पर सचिव शालेय शिक्षण यांना निवेदन देण्यात आले.

Kokan news
Kokan : डंम्पिंग ग्राउंड एमआयडीसी जागेत

संघटनेच्या अन्य मागण्या

कोरोना काळात मयत झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ अनुकंपा तत्त्वानुसार नोकरीत सामावून घ्या. विनाअनुदानित तत्त्वावरील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तत्काळ अनुदान लागू करा. वरिष्ठ व निवड श्रेणीमधील त्रुटी दूर करा. अर्धवेळ सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरण्यात यावी. अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत. शिक्षकेतर चतुर्थश्रेणी प्रवर्गातील भरती प्रचलित धोरणानुसारच करा. कार्यभारानुसार प्रत्येक शाळेत कला व क्रीडाशिक्षकांची विशेष पदे तत्काळ भरा. वादग्रस्त संस्थांमधील मुख्याध्यापक व सर्व प्रकारच्या मान्यतेचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना द्या. कोरोना काळातील रजा विशेष रजा म्हणून मंजूर करा. शासनाकडे थकित असणारी वेतन फरकाची बिले, वैद्यकिय प्रतिपूर्ती, वेतन आयोग फरकाची बिले तत्काळ अदा करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com