

SSC Exam Controversy Erupts in Konkan; Identical Handwriting Sparks Suspicion
sakal
-विनोद दळवी
ओरोस: नीट पेपर फुटीमुळे शिक्षण क्षेत्र ढवळून निघालेले असताना वैभववाडी तालुक्यातील एका केंद्रावर नुकत्याच निकाल लागलेल्या दहावी परीक्षेत सामुदायिक कॉपी झाल्याचा प्रकारही आता पुढे आला आहे. या प्रकरणामध्ये पेपर थेट शिक्षकांनी लिहिल्याचा संशय आहे. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून, दीर्घकाळ राज्यात दहावी, बारावी परीक्षेत अव्वल ठरलेल्या कोकण पॅटर्नसाठी हा धक्का देणारा प्रकार म्हणावा लागेल.