
गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा ... या मंजुळ स्वराबरोबरच ढोल- ताशे, सनई चौघडे, फटाक्यांची आतषबाजी, हर हर मार्लेश्वर', शिव हरा शिव हरा' च्या गजराने सह्याद्रीच्या रांगा दुमदुमल्या. सहयाद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) पार पडला.
थाटामाटात लागले `या` देवांचे लग्न
साडवली - गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा ... या मंजुळ स्वराबरोबरच ढोल- ताशे, सनई चौघडे, फटाक्यांची आतषबाजी, हर हर मार्लेश्वर', शिव हरा शिव हरा' च्या गजराने सह्याद्रीच्या रांगा दुमदुमल्या. सहयाद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) पार पडला. हिंदू लिंगायत पध्दतीने दुपारी 1 वाजून 05 मिनिटांच्या शुभमुहुर्तावर मानकरी व राज्यातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह झाला.
हे पण वाचा - अखेर कोल्हापुरला मिळाले `हे` पालकमंत्री
या विवाह सोहळ्याला गोठणे गावची करवली नटून थटून आली होती. साखरपा येथील वधू गिरीजा देवीची पालखी, मार्लेश्वराची पालखी व सोहळ्याचे यजमान देवरूख येथील वाडेश्वर, मानकरी, पालख्या ,दिडींचे व वजहाड मंडळींचे मंगळवारी रात्रौ मार्लेश्वर पवई येथे आगमन झाले होते. त्यांचे बुधवारी सकाळी विवाहस्थळी स्वागत करून 360 मानकऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण विधीचा प्रारंभ केला. श्री मार्लेश्वर देवाला हळद चढवून कल्याणविधी सोहळ्याला सुरूवात झाली.
हे पण वाचा - कोल्हापूर जिल्हा काबीज करण्यासाठी भाजपची ही नवी रणनीती...
यावेळी रायपाटण, लांजेकर स्वामी, म्हसोळी महाराज, धारेश्वर या स्वामींना मार्लेश्वर मंदिराजवळ आणून पाद्य पूजा व त्यांना आसनस्थ करून त्रिपूर उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. कल्याण विधीत मार्लेश्वराची म्हणजेच नवरदेवाची मूर्ती (चांदीचे टोप) आंगवलीचे अणेराव यांनी मांडीवर घेतली होती. गिरीजामाईची मूर्ती लांजेकर स्वामी मांडीवर घेवून बसले होते. पौरोहित्य धारेश्वर स्वामी व पाटगांवचे जंगम यांनी केले.
हे पण वाचा - गर्भवती पत्नीचा खून करुन पती झाला पसार...
..म्हणून सोहळा यादगार
विवाह सोहळा मार्लेश्वर देवतेच्या गुहेसमोरील सभा मंडपात पार पडला. हा विधी पार पडत असताना गुहेतील देवतेला याचे दर्शन घडणे आवश्यक असते. गंगा सिंधूही मंगलाष्टके वऱ्हाडी मंडळींनी सामुहिकपणे म्हणून सोहळा यादगार केला. रात्रौ साक्षी विडे भरून या सोहळ्याची सांगता झाली.
श्री देव सोमेश्वर व गिरीजा देवीचा विवाह
मार्लेश्वर- गिरीजा देवी विवाहसोहळ्याप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर येथील श्री देव सोमेश्वर व गिरीजा देवीचा विवाह सोहळा मकरसंक्रातदिनी लिंगायत- गुरव धर्मिय शास्त्रानुसार मानकरी, भाविकांच्या साक्षीने थाटात संपन्न झाला. याठीकाणीही भाविकांचा जनसागर लोटला होता.