आज तिच्या लग्नाचा वाढदिवस ; समुद्रकिनारी फक्त पर्स, मोबाईल, ओढणी अन् एक चप्पल

married girl missing beach at Rock Garden
married girl missing beach at Rock Garden

मालवण ; शहरातील रेवतळे येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास असणारी विवाहिता आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान बेपत्ता झाली आहे.  काव्या कृष्णा माजिक (वय 21 मूळ रा. दोडामार्ग) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. रॉकगार्डन येथील समुद्रकिनारी तिची पर्स, मोबाईल, ओढणी व एक चप्पल आढळून आले आहे. याबाबत पती कृष्णा यांनी येथील पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची खबर दिली आहे. 


दरम्यान, काव्या ही रॉकगार्डन येथील खडकाळ भागात पाय घसरून समुद्रात पडली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यादृष्टीने येथील आपत्कालीन ग्रुपच्या वतीने स्कूबा डायव्हर्संनी तिचा समुद्रात शोध घेतला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. समुद्रात उधाणसदृश स्थिती तसेच पाण्यास करंट असल्याने तीन तास सुरू असलेली शोधमोहीम दुपारी उशिरा थांबविण्यात आली. सायंकाळी उशिरा पुन्हा शोधमोहीम राबविली जाईल असे आपत्कालीन ग्रुपचे दामोदर तोडणकर यांनी सांगितले. 

येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून सेवा बजावत असलेले कृष्णा माजिक हे पत्नी काव्यासह रेवतळे येथे राहत होते. सध्या त्यांच्यासोबत मेहूणा व भाऊ वास्तव्यास होता. ते आज सकाळी कामावर गेले. काही वेळाने त्यांच्या भावाने काव्या घरात नसल्याची माहिती दिली. तिचा मोबाईलही लागत नव्हता. कृष्णा यांच्या मोबाईलवर काव्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असा संदेश पाठविला होता. यात रॉकगार्डन याचा उल्लेख केला होता. त्यामुळे कृष्णा यांनी तत्काळ रॉकगार्डन येथे धाव घेतली. मात्र काव्या न सापडता खडकाळ भागात तिची पर्स, मोबाईल, ओढणी, एक चप्पल आढळून आले. परंतु, ती सापडली नाही. लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच बेपत्ता झालेल्या काव्या हिचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू होता. अधिक तपास पोलिस करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com