सकाळ ब्रेकिंग ; 'तो'ही आला कोरोनाग्रस्त महिलेच्याच रुग्णवाहिकेतून 

man traveling ambulance kolhapur corona positive present
man traveling ambulance kolhapur corona positive present

कोल्हापूर - सातारा-कोल्हापूर रुग्णवाहिकेतून प्रवास केलेल्या कसबा बावड्यातील महिलेला कोरोना विषाणुची लागन झाल्याचे कळताच त्याला धडकी भरली. त्याने थेट आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून मीही त्याच रुग्णवाहिकेतून आल्याचे स्पष्ट केले. विठलाईवाडी (ता.करवीर) येथे घरी जाण्यास गावकऱ्यांनी मज्जाव केला म्हणून त्याने खटांगळे (ता.करवीर) येथे बहिणीकडे राहिल्याची कबुलीही दिली आहे. त्याचा स्वॅब घेतला असून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. तर त्याच्या कुटुंबियांना होम क्वॉरंटाईन केले असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सातारा-कोल्हापूर हा रुग्णवाहिकेतून प्रवास केलेल्या कसबा बावड्यातील महिलेला कोरोना झाल्यामुळे शासकीय यंत्रणा हालली आहे. यामध्येच आज याबाब वाचून आणखी एकाने मी ही त्याच रुग्णवाहिकेतून आल्याचा खुलासा केला आणि शासकीय यंत्रणेला आणखी एक धक्का दिला आहे. मुळची विठलाईवाडीत राहणारी ही व्यक्ती कराडमध्ये नोकरीला आहे. संचारबंदीच्या काळात त्याला कोल्हापूरला यायचे होते. त्यामुळे त्याने सातारा-कोल्हापूर येत असलेल्या रुग्णवाहिकेतून प्रवास केला. त्यानंतर त्याला मुळ गावात घेतले नाही म्हणून तो परिसरातील गावात असलेल्या खटांगळे गावातील बहिणीकडे गेला. तेथे त्याला सर्दी, खोकला असल्यामुळे तेथीलच डॉक्‍टरांकडे उपचार घेतले. गेली काही दिवस तेथेच राहिला. मात्र कसबा बावड्यातील बातमी वाचून त्याला धडकीच भरली. त्याने आज दुपारी ही माहिती स्वतःहून आरोग्य यंत्रणेला दिली. तातडीने करवीर तहसिलदारांसह सरकारी फौजफाटा तेथे दाखल झाला. 

हे पण वाचा - अन् तो परत इस्लापुरकांच्या सेवेसाठी रुजु झाला... 

सव्वीस वर्षाचा तरुण आहे. तो कराड मध्ये नोकरीला आहे. ज्या रुग्णवाहिकेतून तो आला आहे त्यामध्येच तो असल्याचे त्याला बातम्यांच्या माध्यमातून कळून चुकले. त्यामुळे आज त्याने थेट ग्रामीण रुग्णालयात जाऊन ही माहिती दिली. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन केले आहे. तर त्याला सीपीआर मध्ये दाखल केले आहे. त्याचा स्वॅब ही घेतला आहे. 
-शीतल मुळे-भांबरे ः करवीर तहसीलदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com