esakal | भुईबावडा घाट रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना; अवजड वाहतूक होणार बंद?
sakal

बोलून बातमी शोधा

भुईबावडा घाट रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना

भुईबावडा घाट रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : भुईबावडा घाटमार्गाने सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करण्याच्या हालचाली प्रशासन पातळीवर सुरू आहेत. ही वाहतूक सुरू करण्यासाठीचे पत्र बांधकाम विभागाने तहसिल कार्यालयाला दिले आहे. सतत कोसळत असलेल्या दरडी आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदयापासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

अवजड वाहतुकीस सोयीस्कर असलेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट रस्ता (ता. १२) जुलैला खचला. त्यामुळे हा घाट २६ जुलैपर्यत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या घाटमार्गावरील सर्व वाहतूक भुईबावडा घाटमार्गे सुरू आहे. गेल्या बारा-तेरा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस, भुईबावडा घाटात सतत कोसळणाऱ्या दरडी आणि त्यातच भुईबावडा घाट रस्त्याने सुरू असलेली मोठ्या प्रमाणात आणि अवजड वाहतूक यामुळे या घाटरस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हा घाटरस्ता काही ठिकाणी खचला आहे. अवजड वाहतूक सुरू राहीली तर अनेक ठिकाणी रस्ता खचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्ग पुन्हा चौथ्या टप्प्यात; हे राहणार सुरु, हे बंद

भुईबावडा घाट रस्ता धोकादायक बनला आहेच, परंतु त्याचबरोबर गगनबावडा-खारेपाटण आणि उंबर्डे-वैभववाडी हे दोन्ही रस्ते अवजड वाहतुकीमुळे जागोजागी धोकादायक बनले आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या घाटमार्गे वाहतूक आणखी काही दिवस सुरू राहीली तर हा घाटमार्गच बंद करावा लागेल, अशी भिती सार्वजनिक बांधकाम विभागाला वाटत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने हा घाटमार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा असे पत्र तहसिल कार्यालयाला दिले आहे.

हेही वाचा: 'एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतरही सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यूच आले'

घाटरस्त्यांची सद्यस्थिती पाहता हा घाटरस्ता अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात यावा, असे देखील बांधकाम विभागाने महसूल विभागाला सुचित केले आहे. दरम्यान महसूल प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे. भुईबावडा घाटरस्ता अवजड वाहतुकीस बंद केल्यास वाहनचालकांना फोंडाघाटमार्गे वाहतूक करावी लागणार आहे. सध्या करूळ घाट बंद असल्यामुळे सर्व वाहतूक याच मार्गाने होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्ग सर्वप्रथम कोरोनामुक्त करा : मुख्यमंत्री ठाकरे

आठवड्यात तीनदा दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात आठवडाभरात तीनदा दरड कोसळली. याशिवाय काही ठिकाणी हा रस्ता दुभंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घाटमार्गाने वाहतूक करणे सध्या जिकरीचे ठरणार आहे.

हेही वाचा: Good News : साताऱ्यासह सिंधुदुर्ग, अलिबागमधील वैद्यकीय महाविद्यालयांना 8 कोटी मंजूर

भुईबावडा घाटात कोसळत असलेल्या दरडी आणि घाटरस्त्याला यापुर्वी पडलेली भेग वाढत असल्यामुळे घाटमार्गावरील अवजड वाहतूक बंद करून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवावी, असे पत्र बांधकाम विभागाकडून तहसिल कार्यालयाला देण्यात आले आहे. त्यासंदर्भातील निर्णय प्रशासन घेईल

- शुभम दुडये, शाखा अभियंता, बांधकाम विभाग

loading image