नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर; घडामोडींना वेग!I Nitesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh Rane

गुन्हा दाखल झाल्यानंतर आ राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर; घडामोडींना वेग!

ओरोस - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर आज भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे हे जिल्हा न्यायालयात (Supreme Court) स्वतः हजर झाले आहे. सर्वोच्य न्यायालयाने १० दिवसांत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जिल्हा न्यायालयात दाखल होत शरणागती पत्करली आहे. याचवेळी त्यांनी जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा: नितेश राणे यांची सिंधुदुर्ग पोलिसांकडून दीड तास चौकशी

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आ राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च (Mumbai High court) न्यायालयात अपील करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अर्ज फेटाळताच सर्वोच्य न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. गुरुवारी याच्यावर सुनावणी होत न्यायालयाने अर्ज फेटाळला. तसेच दहा दिवसांत शरणागती पत्करा व जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करा, असे आदेश दिले होते.

त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप (BJP) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी कधी होईल ? आज झाली तर जामीन मिळेल का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: अखेर नितेश राणे प्रकटले! थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत लावली हजेरी

Web Title: Nitesh Rane Present In District Court File Supreme Court Order In Sindhurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..