टागोर यांचे स्मृतिशिल्प रत्नागिरीत

टागोर यांचे स्मृतिशिल्प रत्नागिरीत
Rabindranath Tagore
Rabindranath Tagoresakal

रत्नागिरी : साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे रत्नागिरीशीही नाते आहे. त्यांचे बंधू रत्नागिरी जिल्हा न्यायाधीश असताना रवींद्रनाथ रत्नागिरीत काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळेच त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी रवींद्रनाथांचे अनोखे म्युरल न्यायालयाच्या इमारतीत साकारण्यात येत आहे.

म्युरलचे काम कोल्हापूरचे आर्टिस्ट किशोर पुरेकर पूर्ण करत आहेत. म्युरलच्या जागेवरील बांधकाम एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर वीणा पुजारी यांच्यामार्फत सुरू झाले आहे. १९१३ ला साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. जगातल्या अत्यंत ज्येष्ठ कवींमध्ये रवींद्रनाथांची गणना होते. निसर्ग हा त्यांच्या काव्याचा आत्मा होता. जन-गण-मन या राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथांसारखे विश्वबंधू विभूतीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या न्यायालयातील परिसराचा वारसा आपण श्रद्धेने जपला पाहिजे, असे सर्वांच्या मनात आहे.

जन-गण-मन या भारताच्या तर आमार शोनार बांगला या बांगलादेशाच्या अशा या दोन्ही राष्ट्र गीतांचे जनक रवींद्रनाथ टागोर होत. एवढेच नव्हे तर श्रीलंकेचे राष्ट्रगीत त्यांच्याच साहित्य प्रेरणेतून घेतले आहे. न्यायालयाच्या परिसरात रवींद्रनाथांच्या काव्यपंक्तींचे भिंतीचित्र (म्युरल) व त्या अनुषंगाने सुशोभीकरण अशी स्मृतिशिल्पाची कल्पना आहे.

जिल्हा न्यायाधीशांच्या निवासस्थानात मुक्काम

रवींद्रनाथांनी लोकांना निसर्ग, भाषा आणि संगीत यावर प्रेम करायला शिकवले. त्यांचे मोठे बंधू एस. बी. ठाकूर त्या काळातील पहिले भारतीय जिल्हा न्यायाधीश होते. त्या काळी म्हणजे १८८६- ८७ च्या दरम्यान रवींद्रनाथ यांनी रत्नागिरी जिल्हा न्यायाधीशांच्या निवासस्थानात काही दिवस मुक्कामाला होते. रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी समोरच्या अथांग अरबी समुद्राचे सौंदर्य न्याहाळत काही काव्यरचना नक्कीच केल्या असतील.

शिल्पासाठी ३६ लाख ८८ हजार

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे ३६ लाख ८८ हजार रकमेच्या म्युरलचे उद्‌घाटन महिनाभरात होत असल्याची माहिती ॲड. अशोक कदम यांच्यासमवेत भेट घेतली असता दिली. तसेच ही रक्कम या शिल्पासाठी सामंत यांनी दिल्याचे अॅड. पाटणे यांनी सांगितले. बंगालमध्ये बाईशेश्रावण रवींद्र सप्ताह श्रावण महिन्यात सुरू होतो. त्याचे औचित्य साधून याचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या भिंतीचित्रासाठी अनेकांचे सहकार्य मिळाल्याबद्दल अॅड. पाटणे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com