सह्याद्रीच्या कुशीत दुर्मिळ वन्यजीवांचा अमूल्य ठेवा उजेडात

अमित गवळे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

  • वन्यजीव अभ्यास, संरक्षण व संवर्धनासाठी ई-मॅमल प्रकल्प
  • जिल्ह्यातील एकमेव कुंडलिका विद्यालय पाटनुस शाळेचा सहभाग

पाली : सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अायसीअायसीअाय बँकेच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील कुंडलिका विदयालयात ई-मॅमल प्रकल्प सुरु आहे.दुर्मिळ वन्य जीवांचा शोध घेवून त्यांचा अभ्यास करण्यासाठी येथे ट्रॅप कॅमेरे बसविले अाहे. यामध्ये दुर्मिळ वन्यजीवांची छायाचित्र अाली असून सह्याद्रिच्या कुशीतील दुर्मिळ प्राण्यांचे अस्तित्व समोर अाले आहे.

मार्च 2017 पासून पालघर ,ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग,सातारा व कोल्हापूर या सात जिल्हयातील एकूण वीस शाळेत हा ई-मॅमल (e-mammal) प्रकल्प चालू आहे.रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाद म्हणजे जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील कुंडलिका विद्यालय या एकमेव शाळेत हा ई-मॅमल प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पा अंतर्गत सह्याद्री पर्वत व त्याच्या आसपास परिसरात आढळणाऱ्या दुर्मिळ वन्य जीवांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमार्फत हा प्रकल्प पाटणूस शाळेत चालू आहे.

या प्रकल्पासाठी सह्याद्री निसर्ग मित्र,चिपळूणचे सर्वेसर्वा भाऊ काटदरे, प्रकल्प अधिकारी म्हणून सागर रेडजी व प्रसाद गोंड काम पाहतात. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांचे कडून समन्वयक म्हणून राहुल खोत काम पाहतात. प्रकल्प शाळेत राबवण्यासाठी शाळेचे अध्यक्ष सुरेश महामुणकर शाळेचे मुख्याध्यापक एस. एच. पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. तर शाळेत संपूर्ण प्रकल्पाचे काम शिक्षक राम मुंडे पाहतात.

वन्य जीवांसाठी सहानूभुती
शाळेत आदिवासी विद्यार्थांचे प्रमाण जवळ जवळ ८५% आहे. या प्रकल्पामुळे त्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांच्या जीवना विषयी सहानुभूती निर्माण होत अाहे. यामुळे भविष्यात शिकारीचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल यात काही शंका नाही असे प्रकल्पाचे संपुर्ण काम पाहणारे शिक्षक राम मुंडे यांनी सकाळला सांगितले.

असा आहे प्रकल्प
या प्रकल्पा अंतर्गत शाळेला तीन ट्रॅप कॅमेरे, एक लॅपटॉप ,ट्रॅप कॅमेऱ्यातील फोटोची प्रिंट काढण्यासाठी प्रिंटर देण्यात आले असून सदरील प्रकल्प दोन वर्ष कालावधीसाठी आहे. पाटनुस व आसपास परिसरामध्ये हे कॅमेरे विद्यार्थ्यांकडून लावले जातात. व दर महिन्याला कॅमेऱ्यातील फोटो लॅपटॉप मध्ये सेव्ह करून पुढे ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)कडे पाठवले जातात . प्रकल्पाअंतर्गत पावसाळ्यात कॅमेरे जेंव्हा काढले जातात त्या वेळेस वन्यजिवांवर आधारित निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात.

हे दुर्मिळ प्राणी टिपले
ट्रॅपच्या या कॅमेऱ्यात आतापर्यंत रानडुक्कर ,भेकर,ससा, रानकोंबडा ,काळ मांजर ,ऊद मांजर, घुबड,मुंगूस, काळ्या तोंडाचे माकड ( वांडर) कैद झाले आहेत . जे प्राणी दिवसा व रात्री सहसा दृष्टीस पडत नाहीत ते प्राणी या कॅमेऱ्याच्या साहाय्याने बघायला मिळत आहेत. आणखी ही दूसरे दुर्मिळ प्राणी या कॅमेऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविलि जात आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: raigad news pali rare wildlife species came in light