रत्नागिरीत गेल्या 24 तासांत 60.20 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात काही ठिकाणी पडली वीज; कोणतीही जीवितहानी नाही
रत्नागिरीत गेल्या 24 तासांत 60.20 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी : कोकणात (rain in konkan) पावसाची रिपरिप सुरु असून रत्नागिरी जिल्ह्यात (ratnagiri district recorded rain 60.20 mm) गेल्या 24 तासांत सरासरी 6.69 मिमी तर एकूण 60.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची ही आकडेवारी प्रशासनाकडून प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये मंडणगड 00.00 मिमी, दापोली 00.00 मिमी, खेड 22.80 मिमी, गुहागर 00.30 मिमी, चिपळूण 23.50 मिमी, संगमेश्वर 05.50 मिमी, रत्नागिरी 01.80 मिमी, राजापूर 03.20 मिमी, लांजा 03.10 मिमी तालुक्यात एकूण 6.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 01 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत दापोली, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांचा समावेश आहे. दापोली तालुक्यात मौजे नानटे येथे 30 मे रोजी 3 व्यक्तींना वीजेचा झटका लागल्याने तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

रत्नागिरीत गेल्या 24 तासांत 60.20 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी - कोरोना जनजागृतीसाठी चक्क SP सायकलवरून रस्त्यावर

याशिवाय चिपळूण तालुक्यात मौजे पेंढांबे येथील मनिषा कदम यांच्या घरावर पडल्याने साक्षी कदम (वय १५), सावरी गमरे (वय १५), विजय गमरे (वय ३०) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील मौजे वाशी तर्फे देवरुखात दिपक शिंदे यांना वीजेचा झटका लागल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेतील सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मौजे डिंगणी येथे वीज पडल्याने पीठाच्या गिरणीची मोटार व इतर सहित्य जळून खाक झाले. या घटनेत १० हजाराचे नुकसान झाले असून कोणतीही जिवीत हानी झालेली नाही, असे रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com