Ratnagiri Political Drama : ...आणि रत्नागिरीत पुन्हा पेटलं जुनं राजकीय वैर! तटकरे अन् योगेश कदम आमनेसामने आल्यावर काय घडलं? दोघांनी नजरा चुकवत एकमेकांकडं फिरवली पाठ

Yogesh Kadam and Sunil Tatkare Face-to-Face Moment : रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती बैठकीपूर्वी योगेश कदम आणि सुनील तटकरे समोरासमोर आले. मात्र, दोघांनीही नजरानजर व संवाद टाळला. या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीये.
Ratnagiri Political Drama

Ratnagiri Political Drama

esakal

Updated on: 

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आज रत्नागिरीत राजकीय दिग्गजांची मांदियाळी जमली होती. या दरम्यान, शासकीय विश्रामगृहावर मात्र एक वेगळाच राजकीय ड्रामा पाहायला (Yogesh Kadam Sunil Tatkare political cold war) मिळाला. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे अचानक समोरासमोर आले; मात्र, एकमेकांकडे पाहणे तर लांबच; पण दोघांनीही सोयीस्करपणे नजरा चुकवत पाठ फिरवून निघून जाणे पसंत केले. माजी मंत्री रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील जुन्या राजकीय वैराचे पडसाद आजच्या या ‘ ‘कोल्ड वॉर’च्या रूपाने उमटल्याचे दिसून आले. या राजकीय घडामोडीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com