निवधे मराठवाडी श्रमदानातून बांधले बंधारे

प्रमोद हर्डीकर
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

आदर्शवत कामगिरी, पाच बंधार्‍यांचा निर्धार

साडवली (रत्नागिरी) : मार्लेश्वर रोड नजिकच्या निवधे मराठवाडीतील लोकांनी शासनाच्या निधिची वाट न बघता आपल्या मजुरीतील रकमेतून व स्वतः श्रमदान करुन देवळाच्या पर्‍यावर बंधारे बांधले आहेत.डोंगर उताराला पाणी थांबत नाही असे म्हणणार्‍या लोकांना त्यांनी चांगले उत्तर दिले आहे.

पाणलोट मधील आपल्या कामाचा अनुभव संतोष चव्हाण यांनी गावासाठी उपयोगात आणला.वाडीतील लोक एकञ आले.भविष्यातील पाणी टंचाई दूर करायची असेल तर आपल्यालाच काहीतरी करावे लागेल म्हणून या गावकर्‍यांनी सामान आणून श्रमदान करुन बंधारे बांधले आहेत. काॅजवेला प्लेटा टाकून २६ लाख ८८ हजार लिटर पाणी साठवले आहे.असे पाच बंधारे बांधण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी ककेला आहे.

शासन दारी येईल काहीतरी करेल याची वाट न बघता संतोष चव्हाण, गणपत चव्हाण, प्रकाश चव्हाण, संजय कदम, गजानन चव्हाण, अरुण चव्हाण, भरत चव्हाण, सुधीर कदम, सुवर्णा चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी योगदान दिले.भविष्यात पाण्याचा साठा वाढवण्यासाठी डोंगरावरच एकाच ठिकाणी चांगला मोठा बंधारा बांधुन पाणी व्यवस्थापन करणार असल्याचे संतोष चव्हाण यांनी सांगितले.पक्का पूल नसल्याने गावात जायला अडचण असली तरी शासकीय अधिकारी यांनी एकदा गावात येवून या बंधार्‍याची पाहणी तरी करावी असेही चव्हाण यांनी सांगितले.
मजुरीचे पैसे एकञ करुन बंधारे बांधून पाणी जपून वापरणार्‍या निवधे मराठवाडी ग्रामस्थांचा आदर्श इतर गावांनी घेणे गरजेचे आहे.एकीतून, श्रमदानातून चांगले काही निर्माण होते हेच यावरुन दिसून येते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: ratnagiri news people contribute to build nala

टॅग्स