Minister Ravindra Chavan
Minister Ravindra Chavanesakal

Ratnagiri Politics : 'मयेकर आमचे सर्वांचेच मामा, ते भाजपवर नाराज नाहीत'; मंत्री चव्हाणांच्या दाव्याने चर्चांना उधाण

चव्हाण यांच्या दौऱ्यामध्ये अशोक मयेकर यांच्यासह नाराज गटातील काही नेते उपस्थित होते.
Summary

अशोक मयेकर पक्षात नाराज असल्याच्या वृत्ताचा चव्हाण यांनी इन्कार केला.

रत्नागिरी : भाजपचे ज्येष्ठ नेते, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर (Ashok Mayekar) हे आमचे सर्वांचेच मामा आहेत. आम्ही भाचे आहोत. ते भाजपमध्ये नाराज नाहीत, असा दावा बांधकाम मंत्री व भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केला आहे.

काल उशिरा रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेवेळी चव्हाण बोलत होते. माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर पक्षात नाराज असल्याचे पुढे आले. पक्षातील निर्णय प्रक्रियेमध्ये आणि नव्या नियुक्ती प्रक्रियमध्ये त्यांना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज होत. त्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची अचानक भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली.

Minister Ravindra Chavan
BJP : 'या' प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग नसेल, तर राजीनामा देईन; भाजप आमदाराचं मोठं विधान, अमित शहांची घेणार भेट

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर असताना काल अशोक मयेकर यांची भेट घेतली. यावेळी अशोक मयेकर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीवर निमंत्रक म्हणून निवड केल्याचे पत्र त्यांना दिले. चव्हाण यांच्या दौऱ्यामध्ये अशोक मयेकर यांच्यासह नाराज गटातील काही नेते उपस्थित होते.

Minister Ravindra Chavan
Manohar Kinekar : कर्नाटक सरकारने आता आमचा अंत पाहू नये; बेळगाव सीमावादावरुन माजी आमदाराचा स्पष्ट इशारा

त्यामुळे आता अशोक मयेकर यांची नाराजी दूर झाली असावी, असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, अशोक मयेकर पक्षात नाराज असल्याच्या वृत्ताचा चव्हाण यांनी इन्कार केला. अशोक मयेकर हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. अशोक मामा आहेत म्हणून आम्ही भाचे आहोत, असे सूचक वक्तव्य चव्हाण यानी करून या विषयाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com