वेंगुर्ले येथे माजी अधिकाऱ्यांचा बंगला फोडला

Robbery In Ex Government Officers House In Vengurle
Robbery In Ex Government Officers House In Vengurle

वेंगुर्ले  ( सिंधुदुर्ग ) - येथील पंचायत समिती कार्यालयानजीक शहरातील भरवस्तीतील दोघा माजी अधिकाऱ्यांचा संयुक्त बंद बंगला चोरट्यांनी फोडला.

यात सिधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांच्या बंगल्यातील सोन्याचे दागिने व घड्याळ असा 2,17,323 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ही चोरी 11 नोव्हेंबरला उघडकीस आली होती.

2 लाख 62 हजार 523 रुपयांचा मुद्देमाल चोरीस

याच बंगल्यातील दुसरे मालक सेवानिवृत्त गटशिक्षण विस्तार अधिकारी वामन चव्हाण यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्याच्या वस्तू मिळून 45,200 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता; मात्र श्री. रेडकर बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरात नेमकी कितीची चोरी झाली हे उघड झाले नव्हते. आता तो तपशील मिळाल्याने दोघांचा मिळून या बंगल्यातील एकूण 2 लाख 62 हजार 523 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद काल (ता.14) येथील पोलिसांत दिली. 

शेगांवहून आल्यानंतर तक्रार दाखल

श्री. रेडकर हे बुधवारी (ता. 13) शेगांव येथून घरी आले. त्यांच्याकडेही चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किमतीनुसार नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील व पोलिस कर्मचारी बंड्या धुरी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com