लालभडक चोच अन् पांढऱ्याशुभ्र पिसांनी वेढलेलं शरीर..; राजापूर समुद्रकिनारा 'सीगल'च्या किलबिलाटाने गजबजला

सीगल पक्ष्याच्या (Seagull Birds) थव्याने तालुक्याची पश्‍चिम किनारपट्टी सध्या फुलून गेली आहे.
Seagull Birds Rajapur Sea
Seagull Birds Rajapur Seaesakal
Summary

जगामध्ये सीगल पक्ष्याच्या सुमारे ९ हजार प्रजाती असून, त्यापैकी सुमारे १२२५ प्रजाती भारतामध्ये आढळतात.

राजापूर : तालुक्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर परदेशी पाहुणे (पक्षी) अवतरले असून, या पाहुण्यांचा गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीवर मुक्काम राहिला आहे. देशाच्या सीमेवरील लडाखच्या (Ladakh) प्रदेशात आढळणारा सीगल पक्षी गेल्या किनारपट्टीवर अवतरला आहे.

लालभडक चोच, पांढरेशुभ्र पिसांनी वेढलेले शरीर अशा आकर्षक असलेल्या या सीगल पक्ष्याच्या (Seagull Birds) थव्याने तालुक्याची पश्‍चिम किनारपट्टी सध्या फुलून गेली आहे. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर गजबजून गेला आहे. या सीगल पक्ष्याला पाहण्यासाठी निसर्गप्रेमींसह पर्यटकांची पावलेही आपसूकच समुद्रकिनारपट्टीकडे वळू लागली आहेत.

Seagull Birds Rajapur Sea
विचित्र योगायोग! 2001 मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला अन् आता..; धैर्यशील मानेंनी सांगितला 'मातोश्रीं'बाबत थरारक अनुभव

गेल्या काही वर्षापासून तालुक्याच्या पश्‍चिम सागरी किनारपट्टी भागात सीगल पक्ष्यांचे आगमन होत असल्याची नोंद झाली आहे. त्याप्रमाणे यंदाही तालुक्याच्या समुद्रकिनारी भागात गेल्या काही दिवसांपासून सीगल पक्षी दिसू लागले आहेत. देशाच्या सीमेवरील लडाख प्रदेशात मुख्यत्वेकरून आढळणारा हा पक्षी थंडीच्या मोसमात राजापूर तालुक्याच्या किनारी प्रदेशात वास्तव्याला येत आहे. थंडीच्या कालावधीत लडाख प्रदेशात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्‍या बर्फामुळे या कालावधीमध्ये सीगल पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही.

ज्या परिसरात खाद्य मिळणे शक्य आहे किंवा वास्तव्याला अनुकूल आहे तिथे हा पक्षी काही कालावधीपुरता अन्य पक्ष्यांप्रमाणे स्थलांतरित होतो. यावर्षीही तालुक्यात सीगल पक्षी स्थलांतरित झाला आहे. वेत्ये, आंबोळगड, नाटे आदी किनारी भागात त्याचे वास्तव्य आहे. आकाशात विलोभनीयरित्या घेतलेली झेप आणि एका झेपेमध्ये भक्ष्याला केलेले लक्ष्य आदी सीगलची विलोभनीय दृष्य आणि त्यामधून होणाऱ्या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनार्‍याकडे वळू लागली आहेत.

Seagull Birds Rajapur Sea
मोठी बातमी! दारू पिऊन झिंगत असतानाच पोलिसांचा डॉक्टरांच्या हायप्रोफाईल पार्टीवर छापा; चार नर्तिकांसह 13 जणांवर कारवाई

अंडी घालण्यासाठी पुन्हा मायदेशी

लालभडक चोच, लाल पाट, पांढरेशुभ्र पिसांचे आकर्षक आणि देखणे शरीर असा सीगल पक्षी दिसतो. जगामध्ये सीगल पक्ष्याच्या सुमारे ९ हजार प्रजाती असून, त्यापैकी सुमारे १२२५ प्रजाती भारतामध्ये आढळतात. थंडीच्या कालावधीमध्ये मुबलक खाद्य आणि समागम करण्यासाठी अनुकूल असलेल्या प्रदेशामध्ये हे पक्षी स्थलांतरित होतात. समागमानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अंडी घालण्यासाठी पुन्हा मायदेशी परतात. स्थलांतरित होणारे पक्षी सुमारे पंधरा हजार कि.मी.चे अंतर साधारणतः तीन महिन्यात ताशी २० ते २५ कि. मी. च्या वेगाने कापतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com