Malvan: शिवरायांच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलयीन कंपनीकडून चाचणी; काम अंतिम टप्प्यातः लोकार्पणासाठी बांधकाम विभाग सज्ज

शिव पुतळ्याच्या लोकार्पणाचा सोहळा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून वरिष्ठांनी त्या दृष्टीने तयारीत राहावे, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी दिली.
Shivaji Maharaj statue undergoing quality test by Australian engineers – final phase before grand unveiling"
Shivaji Maharaj statue undergoing quality test by Australian engineers – final phase before grand unveiling"Sakal
Updated on

मालवणः शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिव पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत पुतळा क्लिनिंग तसेच ग्रॅनाईट बसवण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा नवा पुतळा २०० किलोमीटर वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल, असा बनविला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणी केली आहे.

दरम्यान, या शिव पुतळ्याच्या लोकार्पणाचा सोहळा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून वरिष्ठांनी त्या दृष्टीने तयारीत राहावे, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी दिली.

Shivaji Maharaj statue undergoing quality test by Australian engineers – final phase before grand unveiling"
Satara : रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सहायक कलाकार नदीपात्रात बुडाला, आरडाओरडा अन्..

नौसेना दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ ला मेढा राजकोट किल्ला येथे किल्ल्याची पुनर्बाधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात २६ ऑगस्ट २०२४ ला हा तो कोसळला होता. या दुर्घटनेनंतर राज्याने याच ठिकाणी नव्याने शिवपुतळा उभारण्याचे निश्चित केले. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे असून मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड गाझीपुर उत्तर प्रदेश यांच्यामार्फत हा पुतळा उभारण्याचे काम करण्यात येत आहे. यापूर्वीचा शिव पुतळा हा जमिनीपासून चाळीस फूट उंचीचा होता. मात्र, आता नव्याने साकारण्यात येत असलेला शिव पुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. त्याची दहा वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी टीमकडून कामाची पाहणी व सर्व चाचण्या घेण्याचे काम करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारण्याचे काम केले नव्हते. मुंबईत अरबी समुद्रातील शिवपुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उभारण्यासाठी दिला आहे. मात्र त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मालवण राजकोट किल्ला येथील शिव पुतळा उभारण्याचे पहिल्यांदाच काम सार्वजनिक बांधकामच्या सावंतवाडी विभागाकडे सोपविण्यात आले आहे. मागील शिवपुतळा दुर्घटनेतील त्रुटींवर अभ्यास करून नव्याने उभारलेल्या शिव पुतळ्याचे काम सध्या पूर्णत्वास येत आहे. यासाठी राजकोट किल्ला येथे तपासणी कक्ष स्थापन केला असून सर्व बाजूंचा विचार करूनच सार्वजनिक बांधकाम विभाग पाऊल टाकत आहे.

नौसेना दिनानिमित्त राजकोट येथे उभारण्यात आलेला शिव पुतळा कोसळल्यानंतर तो कोसळण्याचे कारण हे मालवण समुद्रकिनाऱ्यावर ताशी १४० किलोमीटर वाऱ्याचा वेग असल्याने पुतळा पडला असे कारण देण्यात आले होते. त्यानुसार राजकोट किल्ल्यावर वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन शासनाकडून नवीन पुतळा बसवताना विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नवीन पुतळ्याचे काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आले असून त्यांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी टीमकडून कामाची पाहणी व सर्व चाचण्या घेण्याचे काम करण्यात येत आहे.

पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यापूर्वी सुतार यांनी येथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली मालवण किल्ल्यावर प्रचंड वाऱ्याचा वेग असल्याने त्यांनी प्रथम छत्रपतींचा अडीच फूट उंचीचा पुतळा तयार करून घेत तो ऑस्ट्रेलियाला पाठवला होता. तेथे असलेल्या व्हिंटेज कंपनीकडून हा पुतळा वाऱ्याच्या वेगाला कशाप्रकारे प्रतिसाद देईल याची चाचपणी करण्यात आली. या पुतळ्यावर ताशी २०० किलोमीटर वेगाने वारे सोडण्यात आले. त्या वाऱ्यावर पुतळा मजबुतीने उभा राहिला तसे ना हरकत प्रमाणपत्र या व्हिंटेज कंपनीकडून शासनाला पर्यायी पुतळा बनवत असलेल्या कंपनीला देण्यात आले. त्यानंतरच या पुतळ्या बसवण्याच्या कामास सुतार यांच्या कंपनीकडून सुरुवात करण्यात आली. हे सर्व करत असताना पुतळ्याच्या प्रत्येक भागाचे परीक्षण तसेच तपासणी आयआयटी मुंबईकडून करून घेण्यात आली आहे. पुतळ्याचे काम पूर्णत्वास आल्याने येत्या एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी या पुतळ्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागास अद्यापपर्यंत याबाबतच्या कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, वरिष्ठ स्तरावरून तयारीत रहावे कोणत्याही क्षणी या पुतळ्याचे लोकार्पण होईल, असे सांगण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पाटील यांनी दिली.

Shivaji Maharaj statue undergoing quality test by Australian engineers – final phase before grand unveiling"
Satara : जवान मदन जाधव यांना वीरमरण: कण्हेरखेडमध्ये शोककळा; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

असा आहे पुतळा

नव्याने साकारण्यात येत असलेला शिव पुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिव पुतळा आणि शिव पुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे. त्यामुळे शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा बनवण्यात आला आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या ८ मिलीमीटर जाडीच्या पत्राचा उपयोग केला आहे. यासाठी वापरण्यात येणारे स्टील हे स्टेनलेस स्टील आहे. युद्धभूमीतील युद्धाच्या आवेशातील शिवपुतळा यापूर्वी उभारलेल्या शिव पुतळ्याच्या दिशेने नवीन शिव पुतळा उभारला आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने शिव पुतळ्याचा दर्शनी भाग आहे. युद्धभूमीतील युद्धाच्या आवेशात हा शिव पुतळा बनविण्यात आला आहे. छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल आहे. या शिव पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्ष असणार आहे. त्याची दहा वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशन कडे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com