Sindhudurg Ganesh Visarjan : गणरायाच्या विसर्जनासाठी पाणी शोधण्याची वेळ सिंधुदुर्गवासीयांवर नामुष्की ; कुठे पाणी अडवले, तर कुठे स्थळ बदलले

Water Crisis Hits Ganesh Visarjan in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे व्हाळ, नाले आणि नैसर्गिक जलस्रोत आटल्याने गणेश विसर्जनासमोर जलसंकट उभे राहिले आहे.
Sindhudurg Ganesh Visarjan

Sindhudurg Ganesh Visarjan

esakal

Updated on: 

वैभववाडी : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील व्हाळ, नाले कोरडे आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनासमोर जलसंकट उभे राहिले आहे. अनेक गावांतील लोकांनी पाणी अडवून, तर काहींनी अन्य स्रोतांचा वापर करून गणेश विसर्जन केले. दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले असले तरी अकरा दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन अजून बाकी आहे.

त्यामुळे ज्या गावांमध्ये नद्या नाहीत, तेथे विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यंदा १४ सप्टेंबरला यावर्षी गणरायांचे आगमन झाले. त्यानंतर दीड दिवसाने गणरायांच्या विसर्जनाला सुरुवात झाली. गणपती मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रत्येक गावातील, वाडीवस्तीतील लोकांची ठिकाणे ठरलेली असतात. जिल्ह्यातील काही गावांमध्ये नद्या आहेत, तर काही गावांमधून लहान व्हाळ, नाले वाहतात. तलावांमध्ये विसर्जन करण्याची पद्धत येथे अपवादात्मक आहे; परंतु दरवर्षी गणेशोत्सवात दुथडी भरून वाहणाऱ्या नदी-नाले आणि व्हाळांची स्थिती यंदा चिंताजनक आहे.

Sindhudurg Ganesh Visarjan
Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

एकीकडे पावसाने उघडीप दिली, तर दुसरीकडे कडक ऊन, ऑक्टोबर हिटचा तडाखा सप्टेंबरमध्ये जाणवू लागला. त्यामुळे काही अंशी व्हाळ आणि नाल्यांमध्ये असलेले पाणी झपाट्याने कमी झाले. अनेक गावांतील व्हाळांचे डोह कोरडे पडले. काही ठिकाणी अगदी तुटपुंजे पाणी वाहत होते. याच डोहांमध्ये दरवर्षी भाविक गणेशमूर्तीचे विसर्जन करीत असत; परंतु यावर्षी या डोहांमध्ये काही ठिकाणी कमी पाणी, तर काही ठिकाणी कोरडे झाल्यामुळे मूर्ती विसर्जन करणे अशक्य झाले.

दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. आता उद्या (ता. २५) अनंत चतुर्दशीच्या दिवशी उर्वरित गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. ज्या गावात पाण्याचे स्रोत आटले आहेत, त्या गावातील मंडळी आता मुबलक पाण्याच्या डोहाच्या शोधात आहेत. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांनंतर गणेश विसर्जनावर जलसंकट ओढवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस झाला नाही, तर भीषण संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

वैभववाडी : विसर्जनापूर्वी दगड-मातीचा बांध घालताना ग्रामस्थ

आमच्या गावातील तीन-चार वाड्यांमध्ये असलेले नैसर्गिक स्रोतांचे पाणी आटल्यामुळे गणेश विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला; परंतु ग्रामस्थांनी एकजुटीने वाहत असलेल्या पाण्याची साठवणूक केली. बंधारे बांधल्यामुळे पाणीसाठा चांगला झाला. याशिवाय नाधवडे लघू प्रकल्पाचे पाणी देखील विसर्जनासाठी सोडण्यात आले. त्यामुळे विसर्जनात अडचण आली नाही. मात्र, नैसर्गिक स्रोत कमी पावसामुळे आटले आहेत. - सुधीर नकाशे, ग्रामस्थ, नाधवडे

Sindhudurg Ganesh Visarjan
Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

आम्ही दरवर्षी आमच्या ठरलेल्या डोहात गणपती विसर्जन करतो; परंतु यावर्षी त्या डोहात खूपच कमी पाणी होते. त्यामुळे आम्हाला विसर्जनापूर्वी डोहाच्या खालच्या बाजूला दगड-मातीचा वापर करून आडवा बांध घालावा लागला. त्यानंतर झालेल्या पाणीसाठ्यात विसर्जन करण्यात आले. - वैभव मोरे, ग्रामस्थ, भुईबावडा

दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात ३४ टक्के पाऊस कमी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नाही ७० ते ७५ टक्के व्हाळ, नाल्यांतील पाण्याचे प्रमाण घटले ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांकडून पाणी अडवून विसर्जन १० ते १५ टक्के लोकांनी स्थळ बदलले ४० ते ५० वर्षांनंतर उद्‍भवली स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com