Tauktae Cyclone Effects : सिंधुदुर्गात 172 गावांतील 1059 शेतकऱ्यांचे नुकसान

कृषी विभागाने जारी केला नुकसानीचा प्राथमिक अंदाज
Tauktae Cyclone Effects : सिंधुदुर्गात 172 गावांतील 1059 शेतकऱ्यांचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा (tauktae cyclone) जिल्ह्यातील (sindhudurg district) बागायतीला मोठा फटका बसला आहे. १७२ गावांमधील १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या एकूण ३ हजार ३७५.१६ हेक्‍टर क्षेत्रावरील बागेचे (damage crop) नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, (mango) काजू, नारळ, (coconut) सुपारी, कोकम (kokam) आणि केळीचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागायतींचे झाल्याची माहिती अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

आंब्याच्या २७७.६१ हेक्‍टर क्षेत्रावर फळगळ झाली असून ८३२ हेक्‍टर क्षेत्रावरील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. काजूच्या १ हजार ८०१.५६ हेक्‍टरवरील झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत तर ३१७.९२ हेक्‍टरवरील झाडे उन्मळून पडली आहेत. नारळाची एकूण ११.६ हेक्‍टर क्षेत्रावरील झाडे मोडली असून ९९.५२ हेक्‍टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत. सुपारीच्या १२.३८ हेक्‍टर क्षेत्रावरील झाडे मोडून पडली आहेत. कोकमच्या १६.५६ हेक्‍टरवर फळगळती झाली असून १.८४ हेक्‍टर क्षेत्रावरील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. केळीच्या ३.९० हेक्‍टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत.

तालुकानिहाय नुकसान हेक्‍टरमध्ये (damage in hecters)

सावंतवाडी तालुका ः ३८ गावांमधील १३८ शेतकऱ्यांच्या बागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा ः ४०.१०, काजू ः ३२३ , नारळ ः १२.१८, सुपारी ः १.१९ , कोकम ः १.३२ , केळी ः १.३० असे एकूण ३७९.०९ हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाले.

दोडामार्ग तालुका ः १४ गावांमधील १२९ शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा ः ११.९०, काजू ः ५२१.८०, नारळ ः ४.७४, सुपारी ः २.१०, कोकम ः ०.२०, केळी ः १.७२ अशा ५४१.७६ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

Tauktae Cyclone Effects : सिंधुदुर्गात 172 गावांतील 1059 शेतकऱ्यांचे नुकसान
मराठा आरक्षण प्रश्नी भूमिकेबाबत काय म्हणाले संभाजाराजे ?

वेंगुर्ले तालुका ः १९ गावांमधील १३० शेतकऱ्यांच्या बागेंचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा ः ११३.४०, काजू ः ११४.३०, नारळ ः ५.२०, सुपारी ः १.१६, कोकम ः ०.२०, केळी ः ०.२० असे एकूण २३४.४६ हेक्‍टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे.

कुडाळ तालुका ः २४ गावांमधील १४८ शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा ः ३९.५२, काजू ः ४१०.७४, नारळ ः ११.३८, सुपारी ः १.१४, कोकम ः १.३८, केळी ः ०.१८ असे एकूण ४६४.३४ हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आहे.

देवगड तालुका ः आंबा ः ७६५.४२, काजू ः ४४.६०, नारळ ः ९.३२, सुपारी ः ०.१६, कोकम ः ०. १० व केळी ः ०.१० मिळून ८१९.७० हेक्‍टर क्षेत्र असे एकूण १९ गावातील ११९ शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे.

मालवण तालुका ः २७ गवांतील १४७ शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले असून आंबा ः ११४.४८, काजू ः ५४५.५८, नारळ ः ६४.६०, सुपारी ः ६.३९, कोकम ः १४.९०, केळी ः ०.४० असे एकूण ७४६.३५ हेक्‍टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे.

वैभववाडी तालुका ः १३ गावांतील १२९ शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा ः १३.३२, काजू ः ४८.४२, नारळ ः ०.८०, सुपारी ः ०.०६, कोकम ः ०.१२ असे एकूण ६२.७२ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले.

कणकवली तालुका ः १८ गावांमधील ११९ शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा ः १२.२८, काजू ः १११.७४, नारळ ः २.३६, सुपारी ः ०.१८, कोकम ः ०.१८ असे एकूण १२६.७४ हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आहे.

Tauktae Cyclone Effects : सिंधुदुर्गात 172 गावांतील 1059 शेतकऱ्यांचे नुकसान
कोल्हापुरात खत दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

देवगड, मालवणला जास्त हानी

जिल्ह्यात सर्वात जास्त बागांचे नुकसान देवगड तालुक्‍यात झाले असून त्यानंतर मालवण तालुक्‍यास फटका बसला आहे. सर्वात कमी बागांचे नुकसान वैभववाडी तालुक्‍यात झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागांचे झाले असून केळीच्या बागांचे नुकसान सर्वांत कमी आहे. मालवण तालुक्‍यात काजू, नारळ, सुपारी, कोकमच्या बागांना सर्वांत जास्त फटका बसला असून आंब्याचे सर्वांत जास्त नुकसान हे देवगड तालुक्‍यात झाले आहे. केळीच्या जास्त नुकसानीची नोंद दोडामार्ग तालुक्‍यात झाली आहे.

असे झाले नुकसान फळपिक बाधित क्षेत्र (हेक्‍टर)

  • आंबा १,११०.४२

  • काजू २,११९.४८

  • नारळ ११०.५८

  • सुपारी १२.३८

  • कोकम १८.४०

  • केळी ३.९०

"चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यातून ही प्राथमिक स्वरूपाची आकडेवारी समोर आली आहे. प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल."

- एस. एन. म्हेत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग

Tauktae Cyclone Effects : सिंधुदुर्गात 172 गावांतील 1059 शेतकऱ्यांचे नुकसान
उजनीच्या पाण्यासंदर्भातील आदेश रद्द ! जलसंपदामंत्री जयंत पाटलांची घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com