दिलासादायक! रत्नागिरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

दिलासादायक! रत्नागिरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
Summary

अजूनही राज्यातील दहा चिंताजनक परिस्थिती असलेल्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा क्रमांक चौथ्या क्रमांकावर आहे.

रत्नागिरी: मार्च महिन्यात सुरू झालेल्या दुसऱ्‍या लाटेचा प्रभाव जिल्ह्यात ओसरू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिल, मे, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जुलै महिन्यात अठरा दिवसात ६ हजार ४९५ बाधितांची नोंद झाली आहे. जून महिन्यात हाच आकडा दहा हजाराच्या घरात होता. अजूनही राज्यातील दहा चिंताजनक परिस्थिती असलेल्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा क्रमांक चौथ्या क्रमांकावर आहे.

दिलासादायक! रत्नागिरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
चक्रीवादळांचा धोका ; रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्रिसूत्री

जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २९ हजार १६६ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यातील ६८ हजार ३२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४ लाख ६० हजार ८४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमधील ६२ हजार ७०२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचा दर ९२ टक्क्यापर्यंत पोचला आहे. जिल्हा प्रशासनाकडून मागील पंधरा दिवसांत दररोज सात हजार चाचण्यांचे लक्ष्य निश्‍चित करून ग्रामीण भागात अधिक बाधित सापडलेल्या गावांवर लक्ष केंद्रीत केले. गावे, वाड्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून निर्बंध घातले. त्या गावांमध्ये सरसकट चाचण्या करण्यास सुरवात केली.

दिलासादायक! रत्नागिरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर; अनेक गावांचा तुटला संपर्क

जूनच्या मध्यात सुरू केलेल्या या प्रयोगाचा परिणाम जुलैच्या मध्यात दिसू लागला आहे. मे, जून महिन्यात दिवसाला पाचशे बाधित सापडत होते. जुलै महिन्यात ते तीनशे-साडेतीनशेच्या दरम्यान आले आहेत. मागील पंधरवड्यात साडेसहा हजार बाधित सापडले आहेत. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. दरम्यान, नूतन जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिवसाला दहा हजार चाचण्यांसह बारा तासात बाधितांचा आरटीपीसीआर अहवालांवर भर देण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्यापर्यंत येईल.

दिलासादायक! रत्नागिरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
''रत्नागिरी उद्योगनगरी होण्यासाठी राणे यांनी निर्णय घ्यावा''

कोरोनाबाधितांची आकडेवारी

१ ते १८ जुलै : ६ हजार ४९५

१ ते १८ जून : १० हजार ६२४

१ ते १८ मे : ८ हजार ६५७

एकूण मृत्यू : १ हजार ९३८

दिलासादायक! रत्नागिरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
रत्नागिरी जि. प. तील 5 जणांची खातेनिहाय चौकशी होणार

एकही बालक मृत नाही

सध्या दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर पावणेसहा टक्केच्या दरम्यान आहे. आजारी, मधुमेही तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांमध्ये कोरोनाची लागण सर्वाधिक होती. दुसऱ्‍या लाटेमध्ये सर्वाधिक तरुण बाधित झाले असून त्यात मृत्यूचा आकडाही अधिक आहे. तसेच एकूण बाधितांच्या तुलनेत सहा टक्के १४ वर्षांखालील मुले कोरोनामुळे बाधित झाली. सुदैवाने त्यात एकही बालक मृत पावलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com