‘स्वदेश दर्शन’ची अंमलबजावणी करा

‘स्वदेश दर्शन’ची अंमलबजावणी करा

Published on

81286
दिल्ली ः केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली.

‘स्वदेश दर्शन’ची अंमलबजावणी करा
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्हा ‘स्वदेश दर्शन योजना टप्पा- २’ मध्ये सहभागी करून पर्यटनाच्या दृष्टीने नवीन डीपीआर बनवावा आणि स्वदेश दर्शन योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी. जेणेकरून सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळेल. यासाठी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मंत्री रेड्डी यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याला त्वरित डीपीआर केंद्राकडे सादर करण्याचे आदेश दिले.
..................
रेखाकला परीक्षेमध्ये पाट विद्यालयाचे यश
कुडाळ ः पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयातील ३६ विद्यार्थी इंटरमिजिएट या शासकीय रेखाकला परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत पाट विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. ‘अ’ श्रेणीमध्ये दत्तराज ठाकूर, योगेश सरमळकर, जीवन गोसावी, पार्थ गोसावी, शुभम चव्हाण, प्रतीक मेतर, संचिता पाटकर, मंदार कोचरेकर यांनी यश मिळविले. सात विद्यार्थ्यांना ‘ब’ श्रेणी मिळाली. संस्था उपाध्यक्ष डी. ए. सामंत, कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव सुधीर ठाकूर, संस्था पदाधिकारी देवदत्त साळगावकर, सुहास आजगावकर, संजय ठाकूर, मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, गुरुनाथ केरकर यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना संदीप साळसकर यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.